काजोल म्हणते, ‘लहान मुलांची आई असणे सोपे नाही’!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 03:23 PM2017-12-12T15:23:04+5:302017-12-12T20:53:04+5:30
आपल्या मुलांचे पालनपोषण करणे हे प्रत्येक आई-वडिलांसाठी आव्हानात्मक असते. मग तो सर्वसामान्य असो वा खूप मोठा सेलिब्रिटी. काही दिवसांपूर्वी ...
आ ल्या मुलांचे पालनपोषण करणे हे प्रत्येक आई-वडिलांसाठी आव्हानात्मक असते. मग तो सर्वसामान्य असो वा खूप मोठा सेलिब्रिटी. काही दिवसांपूर्वी काजोलने एका संकेतस्थळाला मुलाखत देताना मुलांचे पालनपोषण करणे आव्हानात्मक असून, एक आई म्हणून लहान मुलांचा सांभाळ करणे अजिबातच सोपे नसल्याचे सांगितले. काजोलने म्हटले की, हल्लीची मुले खूपच गंभीर आणि नियमांचे पालन करणारी आहेत. त्यांच्या तुलनेत लहानपणी मी खूपच खोडकर होती. माझ्यात अजिबातच समजुतदारपणा नव्हता. मला आठवतेय की, लहानपणी माझी आई आम्हाला सुट्या एन्जॉय करण्यासाठी लोणावळ्याला घेऊन जात असे. मी माझ्या गर्ल गॅँगसोबत खूप मस्ती करती असे.
काजोलने तिच्या मुलांविषयी बोलताना सांगितले की, बºयाचदा मी माझ्या मुलांना ज्या गोष्टीची शिकवण देते नेमकी तिच गोष्ट माझ्याकडून अनवधानाने चुकते. त्यामुळे मी मुलांना सॉरी म्हणण्यास अजिबातच मागेपुढे बघत नाही. परंतु अजयच्या बाबतीत ही गोष्ट विपरीत आहे. कारण तो काही चूक करीतच नाही. तो पूर्णपणे परफेक्ट आहे. साफसफाईच्या बाबतीत तर तो खूपच अलर्ट असतो. त्याला सर्व काही सुव्यवस्थित हवे असते. खरं तर अजयचा हा गुण मला खूपच भावतो. प्रत्येकानेच स्वच्छतेचे महत्त्व समजून घ्यायला हवे. जेवढी स्वच्छता ठेवाल तेवढेच निरोगी आयुष्य जगता येईल. यासाठी जनजागृती होण्याची गरज असल्याचेही काजोलने म्हटले.
पुढे बोलताना काजोलने म्हटले की, वास्तविक आपल्या देशात बरेचसे असे मुद्दे आहेत ज्यावर चर्चा व्हायला हवी. परंतु मला असे वाटते की, मुलांशी संबंधित समस्यांवर उपाय करणे गरजेचे आहे. कारण मुले आपल्या देशाचे भविष्य आहे. आपल्या लोकसंख्येत ५० टक्के मुलांचा समावेश आहे. मात्र अशातही आपण त्यांना फारसे गांभीर्याने घेत नाही. बºयाचशा रुग्णालयात मुलांसाठी स्वतंत्र बेड नाही. शिक्षण, बालश्रम, गरिबी आदी विषयांवर सरकारी स्तरावर काम व्हायला हवे, असेही काजोल म्हणाली.