अजय आणि काजोलच्या संसारात सर्वकाही आलबेल नाही? 'व्हॅलेंटाइन डे'च्या पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:56 IST2025-02-17T12:48:00+5:302025-02-17T12:56:18+5:30
'परफेक्ट कपल' असणाऱ्या अजय आणि काजोलमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे.

अजय आणि काजोलच्या संसारात सर्वकाही आलबेल नाही? 'व्हॅलेंटाइन डे'च्या पोस्ट चर्चेत
Ajay Devgn and Kajol: अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि अभिनेत्री काजोल (kajol) ही चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. सोशल मीडियावर या जोडीचा मोठा चाहतावर्ग असून अजय किंवा काजोलने एकमेकांसोबत फोटो पोस्ट केले की त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागतो. पण, 'परफेक्ट कपल' असणाऱ्या या दोघांमध्ये आता काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे.
अजय देवगण आणि काजोलच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. एखादे नाते एवढ्या काळ टिकवणे ही काही साधी गोष्ट नाही. अजय देवगण आणि काजोलकडे पाहिले तर हे दोघं खूपच विरुद्ध स्वभावाचे आहेत. पण, आयुष्यातील सर्व चढ-उतारांमध्ये एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलेत. पण, आता काहीतरी वेगळंच चित्र पहायला मिळातंय. अजय आणि काजोलच्या नात्यात काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेला कारण ठरल्या आहेत अजय आणि काजोलनं " व्हॅलेंटाइन डे"च्या दिवशी केलेल्या पोस्ट. दोघांच्या पोस्टमधील विरोधाभास चाहत्यांनी हेरलाय.
यंदाच्या "व्हॅलेंटाइन डे"ला (१४ फेब्रुवारी) अजयनं काजोलसाठी रोमँटिक पोस्ट लिहली. त्यानं काजोलसोबतचा एक जुना फोटो पोस्ट करत लिहलं, "माझं हृदय मी कोणासोबत शेअर करावं, हे खूप आधीचं ठरलं गेलं होतं आणि आजपर्यंत ती गोष्ट तशीच आहे. माझी आजची आणि रोजची व्हॅलेंटाइन.. काजोल".
पण, काजोलनं फक्त स्वत:चा फोटो पोस्ट करत लिहिलं, "मला स्वतःला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा... लव्ह यू". यासोबत तिनं सेल्फ लव्ह असा हॅशटॅगही पोस्ट केलाय. अजयने काजोलला, तर काजोलने स्वत:लाच व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिलेल्या पाहून चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
काजोल आणि अजय यांची पहिली भेट १९९५ मध्ये 'हलचल' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या भेटीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर हळूहळू प्रेमात झालं. अखेर या जोडीने १९९९ मध्ये लग्नगाठ बांधली. आज दोघांना निसा ही मुलगी आणि युग हा मुलगा आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अजय अलिकडेच 'शैतान' या सिनेमात झळकला होता. त्यानंतर तो 'सिंघम अगेन'मध्ये पाहायला मिळाला. आता लवकरचं तो 'रेड २', 'दे दे प्यार दे २' या सिनेमात झळकणार आहे.