काजोल ‘झिंगाट’!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2016 10:40 AM2016-09-12T10:40:23+5:302016-09-12T16:21:11+5:30
बॉलिवूड अभिनेत्री काजोल आजपर्यंत कुठल्याही पार्टीत वा फंक्शनमध्ये नशेत दिसलेली नाही. मात्र आता तिला चांगलीच नशा चढलीयं. होय, ‘मी ...
ब लिवूड अभिनेत्री काजोल आजपर्यंत कुठल्याही पार्टीत वा फंक्शनमध्ये नशेत दिसलेली नाही. मात्र आता तिला चांगलीच नशा चढलीयं. होय, ‘मी नशेत आहे,’ अशी कबुली खुद्द काजोलनेच सोशल मीडियावर दिली आहे. पण थांबा हं... तुम्ही समजताय, तशी ही ड्रग्ज वा अल्कोहोलची नशा मुळीच नाही. काजोलवर सध्या ‘शिवाय’च्या टायटल ट्रॅकची झिंग चढलीय. काल अजय देवगणने ‘शिवाय’चे ‘बोलो हर हर...’ हे टायटल ट्रॅक रिलीज केले . हे गाणे ऐकल्यानंतर काजोलने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. झिंग चढलीय...पण यासाठी ड्रग्ज वा अल्कोहोलची नाही गरज नाही तर ‘शिवाय’ पुरेसा आहे, असे काजोलने लिहिलेय. ‘शिवाय’ या चित्रपटात अजय लीड रोलमध्ये आहे. केवळ एवढेच नाही तर तोच या चित्रपटाचा दिग्दर्शक व निर्माताही आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होतो आहे.