काजोलच्या ‘या’ अभिनेत्याची ट्रॅजेडी वाचून तुमच्या अंगावर येतील शहारे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2017 02:52 PM2017-06-30T14:52:02+5:302017-06-30T20:51:30+5:30

१९९२ मध्ये आलेल्या ‘बेखुदी’ या चित्रपटातील चॉकलेटी हिरोचा चेहरा कदाचित प्रेक्षक विसरले असतील, परंतु त्याच्यासोबत झालेली ट्रॅजेडी ऐकून पुन्हा ...

Kajol's 'Actor' tragedy reads to your family! | काजोलच्या ‘या’ अभिनेत्याची ट्रॅजेडी वाचून तुमच्या अंगावर येतील शहारे!

काजोलच्या ‘या’ अभिनेत्याची ट्रॅजेडी वाचून तुमच्या अंगावर येतील शहारे!

googlenewsNext
९२ मध्ये आलेल्या ‘बेखुदी’ या चित्रपटातील चॉकलेटी हिरोचा चेहरा कदाचित प्रेक्षक विसरले असतील, परंतु त्याच्यासोबत झालेली ट्रॅजेडी ऐकून पुन्हा एकदा त्याचा चेहरा समोर उभा राहील हेही तेवढेच खरे आहे. होय, अभिनेत्री काजोलचा हिरो असलेल्या कमल सदना याच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेतल्यास तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील हे नक्की. बॉलिवूडमध्ये त्याकाळी कमल सदना एक पॉप्युलर चेहरा होता; मात्र त्याची ही जादू अधिक काळ टिकली नाही. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, तर त्याचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली माहिती वाचावी लागेल. 



९० च्या दशकात बॉलिवूडचा पॉप्युलर चेहरा असलेला अभिनेता कमल सदना अचानकच बॉलिवूडमधून गायब झाला. जणू काही तो बॉलिवूड जगतातून दुसºयाच एखाद्या जगतात हरवून गेला; मात्र पुढे तो अशा एका घटनेमुळे चर्चेत आला ज्यामुळे सबंध बॉलिवूड हादरून गेले होते. ही घटना अशी होती की, त्याचा संपूर्ण परिवार २१ आॅक्टोबर १९९० रोजी त्याचा २० वा बर्थ डे सेलिब्रेट करीत होता; मात्र अचानकच त्याचे वडील बृज सदना यांनी नशेत अगोदर त्याची आई सईदा खान आणि नंतर बहीण नम्रता यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. ही घटना अचानकच घडल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. 



कमलची आई आणि बहीण यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी कमलवरही गोळ्या झाडल्या, परंतु त्यातून तो कसाबसा बचावला. त्यानंतर बृज सदना यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. ही सर्व घटना कमल सदनच्या डोळ्यासमोर घडल्याने त्याच्या शरीरातील चेतनाच जणू काही नष्ट झाली. कमलच्या डोळ्यासमोर त्याचा संपूर्ण परिवार काही क्षणातच नष्ट झाला. कमल सदनने एका मुलाखतीत ही संपूर्ण घटना सांगताना म्हटले होते की, ‘मला खरंच माहीत नाही की, पप्पांनी असे का केले? मम्मी-पप्पा यांच्यात नेहमीच वाद व्हायचे; मात्र पप्पा त्यांच्या परिवारासोबत असे काही करतील हा मी कधीच विचार केला नव्हता. या घटनेनंतर मी पूर्ण संपलो होतो. मला काउन्सिलिंगची गरज पडली.  



अभिनेता कमल सदना याने अभिनेत्री दिव्या भारतीसोबत ‘रंग’, टिस्का चोपडासोबत ‘बाजी उमर को सलाम’, रितू शिवपुरीसोबत ‘हम सब चोर है’ आणि काजोलसोबत ‘बेखुदी’ या चित्रपटात काम केले. या व्यतिरिक्त प्रेमी, अंगारा, निर्णायक यांसारख्या चित्रपटांतही तो झळकला होता. कमलचे बॉलिवूड करिअर खूपच आघाडीवर होते. परंतु या घटनेनंतर तो जणू काही अज्ञातवासात निघून गेला. त्याने बॉलिवूडची वाट सोडून दु:खात जाणे पसंत केले. 

Web Title: Kajol's 'Actor' tragedy reads to your family!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.