काजोलच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का? जाळीदार बोल्ड ड्रेस घातल्यानं झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 11:33 IST2025-04-14T11:31:10+5:302025-04-14T11:33:02+5:30

काजोलची सख्खी बहीण तनिषा जाळीदार बोल्ड ड्रेस घातल्यानं ट्रोल झाली आहे.

Kajol's Younger Sister Tanishaa Mukerji Got Trolled For Wearing A Bold Net Dress | काजोलच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का? जाळीदार बोल्ड ड्रेस घातल्यानं झाली ट्रोल

काजोलच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का? जाळीदार बोल्ड ड्रेस घातल्यानं झाली ट्रोल

काजोल (Kajol) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. १९९२ साली 'बेखुदी' चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या काजोलनं बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. काजोलची बहिण तनिषा (Tanishaa) मुखर्जी ही बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे.   काजोल आणि तनिषा या दिग्गज स्टार तनुजा आणि दिग्दर्शक, लेखक तसेच निर्माते शोमू मुखर्जी यांच्या मुली आहेत. तनिषाने २००३ रोजी प्रदर्शित झालेल्या 'श्शsss' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. पण, काजोलच्या पहिल्या चित्रपटांइतके तनिषाचे चित्रपट चांगली कामगिरी करू शकले नाहीत.  तनिषा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

तनिषा मुखर्जी पारदर्शक असलेला जाळीदार ड्रेस घातल्यानं प्रचंड ट्रोल झाली आहे. तनिषा मुखर्जी चित्रपटांमध्ये कमी दिसली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. याशिवाय, ती फॅशन इव्हेंट्समध्येही दिसते. अलिकडेच, ती 'द वर्ड मॅगझिन फॅशन शो'मध्ये सहभागी झाली होती. पण, लोकांना तिचा लूक फारसा आवडला नाही. तिनं काळ्या रंगाच्या नेटचा जाळीदार ड्रेस घातला होता, ज्यावर काही भागांवर पांढऱ्या रंगाची मोठी फुलं होती, ज्यांनी तिच्या शरीराचा काहीच भाग झाकला होता.  अनेकांनी काजोलच्या बहिणीची तुलना उर्फी जावेदशी केली आहे.  



तनिषा मुखर्जी ४७ वर्षांची आहे आणि अजूनही अविवाहित आहे. तिने 'श्श्श्श..' या चित्रपटानंतर 'नील अँड निक्की', 'सरकार', 'टँगो चार्ली' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी' व्यतिरिक्त ती 'झलक दिखला जा'मध्ये देखील स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. 'बिग बॉस'मध्ये तिची आणि अरमान कोहलीची जोडी विशेष चर्चेत होती.  मात्र 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. 

Web Title: Kajol's Younger Sister Tanishaa Mukerji Got Trolled For Wearing A Bold Net Dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.