'कल हो ना हो' सिनेमाला 20 वर्षे पूर्ण; करण जोहरने वडिलांच्या आठवणीत शेअर केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 02:38 PM2023-11-28T14:38:12+5:302023-11-28T14:40:17+5:30

'कल हो ना हो'  सिनेमाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत.

'Kal Ho Na Ho' completes 20 years; Karan Johar shared an emotional post in memory of his father | 'कल हो ना हो' सिनेमाला 20 वर्षे पूर्ण; करण जोहरने वडिलांच्या आठवणीत शेअर केली भावूक पोस्ट

'कल हो ना हो'  सिनेमाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत.


'कल हो ना हो'  सिनेमाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. ऐवढा मोठा कालावधी उलटून गेला असला तरी आजही या चित्रपटाची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. शाहरुख खान, प्रिती झिंटा आणि सैफ अली खान यांचा कल हो ना हो हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाच्या स्मरणात आहे. अनेक हिट चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा आवर्जुन उल्लेख केला जातो. आज या चित्रपटाला रिलीज होऊन 20 वर्षी झाल्यानं करण जोहरनं एक भावून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला 

निखिल अडवाणी दिग्दर्शित 'कल हो ना हो' सिनेमातील गाण्यांपासून ते प्रत्येक संवादानी प्रेक्षकांवर अमिट छाप सोडली. या चित्रपटात शाहरुख खान, सैफ अली खान आणि प्रिती झिंटा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  या चित्रपटाची २० वर्षे साजरी करताना करण भावूक झाला.  करणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला. शिवाय, करण जोहरने व्हिडीओसोबत एक लांबलचक नोटही लिहिली.

 तो म्हणाला, 'हा चित्रपट माझ्यासाठी आणि कदाचित आपल्या सर्वांसाठी भावनिक प्रवास ठरला. अशा अप्रतिम स्टारकास्टला आम्ही एकत्र आणले जी हृदयाला भिडते. संपूर्ण टीम आणि कॅमेऱ्याच्या मागील कलाकारांचे खूप खूप अभिनंदन ज्यांनी 'कल हो ना हो' हा चित्रपट बनवला'. 

पुढे करणने लिहिले, 'माझ्यासाठी हा शेवटचा चित्रपट आहे, ज्यात माझ्या वडिलांनी धर्मा परिवारातील सदस्य म्हणून काम केलं. आजही जेव्हा मी पुन्हा हा चित्रपट पाहतो, तेव्हा प्रत्येक फ्रेममध्ये मला त्यांची उपस्थिती जाणवते. आम्हाला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन केल्याबद्दल.  जे योग्य आहे त्यासाठी नेहमी पाठिशी उभे राहिल्याबद्दल आणि महत्त्वाच्या कथा तयार केल्याबद्दल धन्यवाद, बाबा... मला नेहमी तुमची आठवण येते'. 

'कल हो ना हो' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता. व त्याला अनेक पुरस्कार मिळाले होते. चाहते हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात.  या चित्रपटात जया बच्चन, दारा सिंह, झनक शुक्ला आणि सोनाली ब्रेंद्रे यांसारखे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

Web Title: 'Kal Ho Na Ho' completes 20 years; Karan Johar shared an emotional post in memory of his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.