‘कलंक’चा ट्रेलर पाहून बिथरले माधुरी दीक्षित व संजय दत्तचे फॅन्स! हे आहे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 10:48 AM2019-04-04T10:48:57+5:302019-04-04T10:50:02+5:30
कालच करण जोहरचा आगामी मल्टीस्टारर चित्रपट ‘कलंक’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आणि माधुरी दीक्षित व संजय दत्तचे फॅन्स बिथरले.
कालच करण जोहरचा आगामी मल्टीस्टारर चित्रपट ‘कलंक’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला. चित्रपट रिलीज व्हायला उणेपुरे १३-१४ दिवस उरले असताना हा ट्रेलर रिलीज केला गेला. ‘कलंक’च्या ट्रेलरमधून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे पे्रमाचा त्रिकोण. होय, या चित्रपटात आलिया-वरूण आणि आदित्य राय कपूर व सोनाक्षी सिन्हा यांच्या ‘लव्ह ट्रँगल’ दाखवण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये सगळेच स्टार्स दिसले. पण यातही माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांनी केवळ झलक तेवढी दिसली. मग काय? माधुरी व संजयच्या चाहत्यांनी लगेच याबद्दल नाराजी बोलून दाखवली.
माधुरी व संजयची जोडी तब्बल दोन दशकांनंतर एकत्र दिसतेय. साहजिकच चाहते, या जोडीची केमिस्ट्री पाहण्यास उत्सुक होते. पण ‘कलंक’च्या ट्रेलरमध्ये दोघांनाही न्याय न मिळाल्याचे पाहून चाहते संतापले. आपला हा संताप अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर बोलून दाखवला.
🐍🐍🐍
— rony (@rony1985ghosh) April 3, 2019
One dialouge for @duttsanjay and @MadhuriDixit
As expected frm u.. https://t.co/YNeMUdTF0d
— NiShA (@MadzNishhh) April 3, 2019
‘तुम्ही संजय दत्तला ट्रेलरमध्ये दाखवलेच नाही. हा केवळ आलिया आणि वरूणचा सिनेमा आहे का?,’ असा सवाल एका चाहत्याने केला. एका चाहत्याने तर चित्रपटात माधुरी दीक्षितपेक्षा कुणाल खेमू दिसतोय, याकडे मेकर्सचे लक्ष वेधले.
More Kunal Khemu than Madhuri in the trailer? Hmmm
— Vishal (@rasika79) April 3, 2019
Quite good..but we want more of madhuri's footage— bhaswar chatterjee (@BhaswarC) April 3, 2019
माधुरी व संजय यासारख्या दिग्गज कलाकारांकडे ट्रेलरमध्ये दुर्लक्ष केले जावे, हे दुर्दैवी आहे, असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरने तर चांगलीच भडास काढली. तुम्ही माधुरी दीक्षित व संजय दत्तच्या चाहत्यांचा वापर केला. ही चाहत्यांची शुद्ध फसवणूक आहे. माधुरीचे नाव प्रमोशनमधूनही गाळण्यात आले, असे या युजरने लिहिले.
एकंदर काय तर ‘कलंक’च्या ट्रेलरमध्ये माधुरी व संजयला फार महत्त्व न दिल्याने चाहते दुखावले. आता चित्रपटाच्या कमाईवर त्याचा किती असर होतो, ते बघूच.