'कल्कि २८९८ एडी' सिनेमाची कमाई ४०० पार! विकेंडला कमाईत जबरदस्त वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 11:35 AM2024-07-01T11:35:40+5:302024-07-01T11:36:07+5:30

'कल्कि २८९८ एडी' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. या सिनेमाने चार दिवसात बक्कळ कमाई केलीय.

Kalki 2898 AD box office collection day 4 prabhas amitabh bachchan kamal haasan | 'कल्कि २८९८ एडी' सिनेमाची कमाई ४०० पार! विकेंडला कमाईत जबरदस्त वाढ

'कल्कि २८९८ एडी' सिनेमाची कमाई ४०० पार! विकेंडला कमाईत जबरदस्त वाढ

'कल्कि २८९८ एडी' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पादुकोण आणि कमल हासन यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. आधुनिक कथेला पौराणितेची जोड दिल्याने 'कल्कि २८९८ एडी' लोकांना आवडतोय. 'कल्कि २८९८ एडी' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. या रिपोर्टकडे नजर मारता लक्षात येईल सिनेमाने चार दिवसात ४०० पार कमाई केलीय.

'कल्कि २८९८ एडी' चा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

'कल्कि २८९८ एडी' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय.  Sacnilk  च्या अहवालानुसार, सिनेमाने रिलीजच्या ४ दिवसांतच ३०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी ९५.३ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी ५७.६ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी ६४.५ कोटी रुपये कमावले आहेत आणि चौथ्या दिवशी ८५ कोटी रुपये कमावल्याचा अंदाज आहे. याशिवाय जगभरात सिनेमाने चांगली कमाई केली असून सिनेमाच्या जगभरातल्या बॉक्स ऑफिसवर ४०० कोटी पार केले आहेत.

'कल्कि २८९८ एडी' सिनेमाविषयी

'कल्कि २८९८ एडी' सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे. काल गुरुवारी २७ जूनला हा सिनेमा जगभरात रिलीज झालाय. विशेष म्हणजे सिनेमात महाभारताचा सुरेख संबंध जोडण्यात आलाय. 'अश्वत्थामा' आणि 'श्रीकृष्ण' यांच्यातला भन्नाट संवाद सिनेमात पाहायला मिळतो. सिनेमात प्रभासदीपिका पादुकोण, कमल हासनअमिताभ बच्चन या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. पहिल्याच दिवसापासूनच हा सिनेमा कमाईचे विविध आकडे तोडत आहे.

 

Web Title: Kalki 2898 AD box office collection day 4 prabhas amitabh bachchan kamal haasan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.