दीपिका-प्रभासच्या 'कल्कि 2898 AD' सिनेमाची पहिल्या दिवशी बंपर कमाई! जाणून घ्या कलेक्शनचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 10:49 AM2024-06-28T10:49:02+5:302024-06-28T10:50:05+5:30

Kalki 2898 AD Box Office Collection : अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, प्रभास अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाच्या पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

kalki 2898 AD box office collection prabhas deepika padukone starrer film earned 95cr on first day | दीपिका-प्रभासच्या 'कल्कि 2898 AD' सिनेमाची पहिल्या दिवशी बंपर कमाई! जाणून घ्या कलेक्शनचा आकडा

दीपिका-प्रभासच्या 'कल्कि 2898 AD' सिनेमाची पहिल्या दिवशी बंपर कमाई! जाणून घ्या कलेक्शनचा आकडा

'कल्कि 2898 एडी' या बिग बजेट बॉलिवूड सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर गुरुवारी (२७ जून) हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, प्रभास अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. आता सिनेमाच्या पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

प्रदर्शनाच्या दिवशी 'कल्कि 2898 एडी' सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमाचे शो थिएटरमध्ये हाऊसफूल झाल्याचं पाहायला मिळालं. 'कल्कि 2898 एडी' सिनेमा बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडणार असल्याचं म्हटलं जात होतं. या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमधून तब्बल १८ कोटींची कमाई केली होती. 

सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, प्रदर्शनाच्या दिवशी 'कल्कि 2898 एडी' सिनेमाने देशात ९५ कोटींचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाने तेलुगुमध्ये ६४.५ कोटी, तमिळमध्ये ४ कोटी, हिंदीत २४ कोटी, कन्नडमध्ये ०.३ कोटी आणि मल्याळममध्ये २.२ कोटींचा गल्ला जमवला. केवळ देशातच नाही तर जगभरात या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. 'कल्कि 2898 एडी' सिनेमाने वर्ल्डवाइड १८० कोटींचा बिझनेस केला आहे. 

नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्कि 2898 एडी' हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. एका महाकाव्यावर हा सिनेमा आधारित आहे.  ६०० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमात दीपिका, अमिताभ बच्चन, प्रभास यांच्याबरोबर कमल हसन, दिशा पटानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'कल्कि 2898 एडी' सिनेमा देशात तब्बल ४५०० ते ५००० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. IMAX आणि 3D फॉर्मेटमध्येही हा सिनेमा प्रदर्शित केला गेला आहे. हिंदीबरोबरच तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्येही हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 

Web Title: kalki 2898 AD box office collection prabhas deepika padukone starrer film earned 95cr on first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.