रिलीज होऊन २४ तास नाही उलटले तोच 'Kalki 2898 ad' ऑनलाईन HD उपलब्ध, निर्मात्यांचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 01:23 PM2024-06-27T13:23:12+5:302024-06-27T13:25:05+5:30

Kalki 2898 ad सिनेमा रिलीज होताच पायरसी होऊन सिनेमा लीक झालाय

Kalki 2898 ad movie leaked online affect of piracy prabhas amitabh bachchan | रिलीज होऊन २४ तास नाही उलटले तोच 'Kalki 2898 ad' ऑनलाईन HD उपलब्ध, निर्मात्यांचं नुकसान

रिलीज होऊन २४ तास नाही उलटले तोच 'Kalki 2898 ad' ऑनलाईन HD उपलब्ध, निर्मात्यांचं नुकसान

Kalki 2898 ad सिनेमा आज सगळीकडे रिलीज झालाय. गेल्या अनेक महिन्यांपासून Kalki 2898 ad सिनेमाची उत्सुकता शिगेला होती. अखेर मल्टीस्टारर बहुचर्चित सिनेमा आज रिलीज झालाय. Kalki 2898 ad चं बजेट तब्बल ६०० कोटी असल्याचं सांगितलं जातंय. याशिवाय प्रभास, कमल हासन, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण असे बडे स्टार्स या सिनेमात आहेत. Kalki 2898 ad च्या रिलीजला २४ तास उलटत नाही तोच सिनेमा ऑनलाईन लीक झालाय. त्यामुळे निर्मात्यांना मोठा फटका बसलाय.

Kalki 2898 ad ऑनलाईन लीक HD  मध्ये

प्रभास, अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला Kalki 2898 ad ऑनलाईन लीक झालाय. हा सिनेमा तमिळरॉकर्स, MP4Movies, VegaMovies आणि FilmyZilla सह अनेक साइटवर फुल HD प्रिंटमध्ये मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. लीक झाल्यामुळे सिनेमाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे निर्मात्यांना कोट्यवधींचे नुकसान होऊ शकते, असे बोलले जात आहे. याआधीही अनेक सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांत पायरसीचे बळी ठरले आहेत. त्यामुळे Kalki 2898 ad च्या कमाईवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Kalki 2898 ad विषयी

‘कल्की 2898 एडी’ सिनेमात अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित आणि वैजयंती मूव्हीज निर्मित हा बहुभाषिक पौराणिक कथेवर प्रेरित असलेला साय-फाय सिनेमा २७ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय काही बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्यांनी सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका केल्याचं सांगितलं जातंय.

 

Web Title: Kalki 2898 ad movie leaked online affect of piracy prabhas amitabh bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.