कल्की कोच्लिनने मुलीचे नाव ठेवले ‘Sappho’; जाणून घ्या काय होतो अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 12:24 PM2020-02-10T12:24:47+5:302020-02-10T12:44:50+5:30
अभिनेत्री कल्की कोच्लिनने शुक्रवारी रात्री एका गोंडस कन्येला जन्म दिला.
बॉलिवूडची दमदार अभिनेत्री कल्की कोच्लिनने शुक्रवारी रात्री एका गोंडस कन्येला जन्म दिला. लग्नाआधीच कल्की आई झाली. आता कल्कीने मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे. कल्कीने मुलीचे ‘साफो’ (Sappho) असे नामकरण केले आहे.
आता ‘साफो’ या नावाचा अर्थ काय? हे जाणू घेण्यास तुम्ही उत्सुक असाल. तर ‘साफो’ हा एक ग्रीक भाषेतील शब्द आहे. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, ‘साफो’ नावाची एक कवयित्री होती. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात लेसबोस नावाच्या बेटावर ( लेस्बियन हा शब्द ‘लेसबोस’ नावाच्या ग्रीक बेटावर बेतला आहे.)एका संपन्न कुटुंबात ‘साफो’चा जन्म झाला होता. लेसबोसमध्ये जन्मल्यामुळे तिला पहिली लेस्बियन कवयित्री म्हणूनही ओळखले जाते. तिचा प्रचंड नावलौकिक होता. आपल्या कवितांमधून स्त्रियांच्या सौंदर्यावर भाष्य करणा-या ‘साफो’ने मला स्त्रिया आवडतात असे म्हटले होते.
कल्की म्हणाली, ‘साफो’चे स्वागत करा
‘साफो’चे स्वागत करा. नऊ महिने एखाद्या मोमोजसारखी ती माझ्या गर्भाशयात शांत पहुडलेली होती. आता तिला नव्या जगात थोडी जागा देऊया. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करणाºयांचे आभार.... प्रसूतीवेदना सहन करणा-या महिलांचा कायम आदर करा. आपण त्यांचा आदर करायलाच हवा, असे कल्कीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कल्कीने लग्नाआधीच मुलीला जन्म दिला आहे. 2019 मध्ये कल्कीने ती प्रेग्नंस असल्याची घोषणा केली होती. कल्की लग्नाआधीच आई होणार म्हटल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. दीर्घकाळापासून कल्की इस्रायली पियानोवादक गाय हर्शबर्गला डेट करतेय. दोघांनी अद्याप लग्न केलेले नाही.
कल्की केवळ एक गुणी अभिनेत्रीच नाही तर एक लेखिका सुद्धा आहे. फ्रेंच वडील आणि भारतीय आई लाभलेल्या कल्कीचे आजोबा मॉरिस कोल्चिन हे आयफेल टॉवर आणि स्टॅच्यू आॅफ लिबटीर्चे चीफ इंजिनिअर होते.कल्कीला फ्रेंचशिवाय हिंदी, इंग्लिश आणि तामिळ भाषा येतात. ‘देव डी’साठी कल्कीला बेस्ट सपोर्टीं अक्ट्रेसचा फिल्मफेअर अवार्ड मिळाला. यानंतर ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’,‘ये जवानी है दीवानी’,‘माय फ्रेंड पिंटो’,‘शैतान’,‘शंघाई’ अशा अनेक चित्रपटांत झळकली आहे.
2009 मध्ये ‘देव डी’ या चित्रपटाच्या सेटवर कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. पण घटस्फोटानंतरही आजही कल्की व अनुराग कश्यप एकमेकांचे चांगले मित्र आहेत.