ऐकलं का? केआरकेला पुढच्या जन्मात व्हायचंय ‘रवीना टंडन’
By रूपाली मुधोळकर | Published: October 21, 2020 02:39 PM2020-10-21T14:39:40+5:302020-10-21T14:41:29+5:30
म्हणे, देवा मला मुलगी म्हणून जन्मास घाल...
स्वत:ला बॉलिवूडचा सर्वात मोठा समिक्षक मानणारा केआरके अर्थात कमाल खान कधी काय बोलेल याचा नेम नाही. नेहमीच वादग्रस्त ट्विट करुन चर्चेत राहणा-या केआरकेने आता असे एक ट्विट केले की. सगळेच हैराण झालेत. या ट्विटमध्ये त्याने चक्क पुढच्या जन्मात मुलगी म्हणून जन्मास येण्याची इच्छा व्यक्त केली. हे ट्विट का तर रवीना टंडनसाठी. होय, या ट्विटद्वारे त्याने रवीनाला जोरदार टोला लगावला.
‘ देवा, तुला एकच प्रार्थना करतो. पुढच्या जन्मी मला एक सुंदर आणि चांगली मुलगी म्हणून जन्मास घाल. जेणेकरून मला आयुष्यात कधीही कोणती मेहनत करावी लागणार नाही’, असे ट्विट केआरकेने केले.
Bas God Se Ek hi request hai Ki Agle Janam Main, Mujhe Ek mast sundar Ladki Banana. Taaki Zindagi main Bilkul Bhi Mehnat Naa Karni Pade.
— KRK (@kamaalrkhan) October 20, 2020
त्याच्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली. पण आत्ता अचानक केआरकेने हे ट्विट का केले? हे काहीकेल्या लोकांच्या लक्षात येईना. शेवटी केआरकेनेच आणखी एक ट्विट करून याचे उत्तर दिले. ‘लोकांना माझ्या ट्विटचा अर्थ का कळत नाही, हेच मला समजत नाही. अरे यार, सुंदर मुलीला नेहमी श्रीमंत नवरे मिळतात आणि त्यांच्या पैशावर या मुली अख्खे आयुष्य मजेत काढतात. त्यामुळे मुलगी म्हणून जन्मास येणे चांगले. म्हणून पुढच्या जन्मी मला मुलगी बनव, असे मी देवाला म्हणालो. माझे नाव रवीना टंडन असू शकेल,’
I can’t understand, why so many people don’t understand my tweets? Arey Yaar a beautiful girl always gets a multimillionaire husband and enjoy her entire life with his money. So it’s really good. So I want to do same thing during my next birth. My name should be Raveena Tondon. https://t.co/zyNR5p8v1L
— KRK (@kamaalrkhan) October 20, 2020
या दुस-या टिष्ट्वटमध्ये अभिनेत्री रविना टंडनच्या नावाचा उल्लेख बघून लोकांना केआरकेच्या ट्विटचा अर्थ आणि त्याचा नेमका रोख कळला. आता रवीनाने केआरकेचे काय बिघडवले तर केआरकेला एखाद्याला लक्ष्य करायला निमित्त लागत नाही, हेच खरे. याआधीही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना त्याने असेच लक्ष्य केले आहे.
हा कॅनडा नाही भारत...
‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या निमित्ताने अलीकडे केआरकेने अक्षय कुमारवर निशाणा साधला होता. ‘देवी लक्ष्मी धन आणि सौभाग्यचे प्रतिक आहे. अक्षय कुमारने देवी लक्ष्मीचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी प्रेक्षकांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा. हा कॅनडा नाही भारत देश आहे. इथे देवी-देवतांची पुजा केली जाते. त्यांची चेष्ठा करत नाही,’ अशा आशयाचे ट्विट करुन त्याने ‘लक्ष्मी बॉम्ब’वर बंदी घालण्याची मागणी केली होती.