2024 मध्ये पुन्हा मोदीजी जिंकणार...; कमाल आर खानने सांगितलं कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 02:28 PM2021-09-01T14:28:49+5:302021-09-01T14:29:35+5:30
केआरकेचं प्रत्येक ट्वीट चर्चेचा विषय ठरतं. आता केआरकेच्या अशाच एका ट्वीटची चर्चा रंगलीये...
आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत राहणारा बॉलिवूडचा स्वयंभू समीक्षक कमाल आर खान (Kamaal Rashid Khan)अर्थात केआरके (KRK) बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत प्रत्येक मुद्यावर बोलतो. अनेकदा सेलिब्रिटींना लक्ष्य करतो, राजकीय मंडळींची शाळा घेतो. सेलिब्रिटी आताश: त्याला जराही सीरिअसली घेत नाहीत. पण तरीही केआरके बरळत राहतो. त्याचं प्रत्येक ट्वीट चर्चेचा विषय ठरतं. आता केआरकेच्या अशाच एका ट्वीटची चर्चा रंगलीयं.
होय, 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशाचा पंतप्रधान कोण होणार, यावरचं त्याचं ट्वीट सध्या व्हायरल होतंय. या ट्वीटमध्ये त्याने 2024 मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असं भाकीत वर्तवलं आहे. विशेष म्हणजे, यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे.
Now @MamataOfficial wants to become next PM. @RahulGandhi wants to become next PM. @NitishKumar also wants to become next PM. And many more also want to become PM. Means #ModiJi will win in 2024 also.
— KRK (@kamaalrkhan) August 30, 2021
‘आता ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान व्हायचं आहे, राहुल गांधी यांनाही पंतप्रधान व्हायचं आहे आणि नीतीश कुमार यांना देखील पंतप्रधान बनायचं आहे. इतरही अनेकांना पंतप्रधान व्हायचं आहे. याचा अर्थ एकच तो म्हणजे, 2024 मध्ये पुन्हा मोदीजी निवडणूक जिंकणार,’ असं ट्वीट केआरकेने केलं आहे.
केआरकेच्या या ट्वीटवर सध्या कमेंट्स पाऊस पडतोय. काहींनी त्याच्या या मताचं समर्थन केलं आहे तर काहींनी नेहमीप्रमाणे केआरकेला ट्रोल केलं आहे.
काही आठवड्यांपूर्वी केआरकेने मोदींना लक्ष्य करत, 2024 मध्ये मी मोदींना सोडून कोणालाही मत देईल, असं तो म्हणाला होता. ‘मी 2024 च्या निवडणुकीत कोणालाही मत देईन, पण मोदींना देणार नाही. कारण ते पब्लिसिटी स्टंट जास्त अन् काम कमी करतात,’ असं ट्वीट त्याने केलं होतं.
2014 मध्ये तर मोदी पंतप्रधान झालेच तर मी भारत सोडून जाईल, असं त्याने जाहिर केलं होतं. ‘मोदीजी पंतप्रधान झाल्यास मी भारत सोडून जाईन. शाहरुख सलमान किंवा आमिर काहीच बोलले नाहीत,’असं तो त्याच्या एका ट्वीटमध्ये म्हणाला होता.