11 वर्षे या अभिनेत्रीसोबत लिव्हइनमध्ये होते कमल हसन, नातं तुटण्याच हे होतं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 11:29 AM2019-07-02T11:29:19+5:302019-07-02T11:35:15+5:30
कमल हसन हे त्यांच्या करिअर आणि पसर्नल लाईफला घेऊन नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
कमल हसन हे त्यांच्या करिअर आणि पसर्नल लाईफला घेऊन नेहमीच चर्चेत राहिले आहेत. कमल हसन जवळपास 11 वर्षे अभिनेत्री गौतमी यांच्यासोबत लिव्हइन रिलेशनशीपमध्ये होते. 2016मध्ये दोघे विभक्त झाले. गौतमी आज आपला 51वा वाढदिवस साजरा करतायेत.
गौतमी यांनी कमल हसन यांच्या आधी 1998मध्ये उद्योगपती संदीप भाटिया यांच्यासोबत लग्न केले होते. गौतमी आणि संदीप यांचा 1999 साली घटस्फोट झाला. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार गौतमी आणि कमल हसन यांची ओळख 'अपूर्वा सगोधररगल'च्या सेटवर झाली. 2005 पासून दोघांनी लिव्हइनमध्ये राहण्याची सुरुवात केली. शाबास नायडूच्या सेटवर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या सिनेमाच्या कॉस्च्युम डिझायनर गौतमी होत्या. रिपोर्टनुसार श्रृतीने या सिनेमात गौतमीने डिझायन केलेले कपडे घालण्यास नकार दिला. त्यामुळे कमल हसन आणि गौमती यांच्यात जोरदार भांडण झाले हे भांडण ऐवढे वाढले की सिनेमाचं शूटिंग रद्द करावी लागली होती आणि इथेच दोघांच्या नात्यामध्ये ठिणगी पडल्याचे समजते.
गौतमीने दोघे विभिक्त झाल्यानंतर एक पोस्ट लिहिली होती. यात त्यांनी लिहिले होते की, ‘मी आणि मि. हासन आता एकत्र नाहीत, हे जाहिर करताना आज मला प्रचंड दु:ख होते आहे. माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत घेतलेल्या निर्णयांपैकी हा सर्वांत कठीण निर्णय होता. एका घट्ट नात्याची विण सैल झालीय, हे पचवणे सोपे नाही. मार्ग वेगवेगळे आहेत, हे सत्य मानण्याशिवाय कधीकधी कुठलाही पर्याय उरत नाही. हे सत्य मान्य करून एकट्याने पुढे जाण्यातच शहाणपणा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जपलेल्या एका नात्याचा शेवट करणे माझ्यासाठी सोपे नव्हते. सहानुभूती मिळवणे वा कुणाला दोष देणे माझा उद्देश नाही. बदल हा जगाचा नियम आहे. माझ्या आयुष्यातून मीही हे शिकले आहे. मी सर्वांत आधी आई आहे आणि ही जबाबदारी निभवणे माझे पहिले कर्तव्य आहे. यालाच आता माझे प्राधान्य असेल. इंडस्ट्रीत येण्यापूर्वीपासून मी हासन यांची चाहती राहिली आहे, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. मी यापुढेही त्यांची चाहती असेल. त्यांच्या प्रत्येक कामात मी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. ते क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची संधीही मला मिळाली. याबद्दलही मी स्वत:ला नशीबवान समजते. मि. हासन म्हणजे एक गुणांची खाण आहेत. भविष्यातही त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यातील अनेक गुण पाहायला मिळतील, असा मला विश्वास आहे. त्यांच्या यशाची मी कामना करते.’