कमल हासन राजकारणासाठी चित्रपट सोडण्यास तयार, म्हणाले -'...तर सिनेइंडस्ट्रीतून कायमची घेईन निवृत्ती '

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 10:56 AM2021-04-05T10:56:32+5:302021-04-05T10:57:16+5:30

कमल हासन कोईम्बतूर साऊथ वेस्ट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 

Kamal Haasan ready to quit film for politics, says - '... then I will retire from Cineindustry forever' | कमल हासन राजकारणासाठी चित्रपट सोडण्यास तयार, म्हणाले -'...तर सिनेइंडस्ट्रीतून कायमची घेईन निवृत्ती '

कमल हासन राजकारणासाठी चित्रपट सोडण्यास तयार, म्हणाले -'...तर सिनेइंडस्ट्रीतून कायमची घेईन निवृत्ती '

googlenewsNext

तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. ६ एप्रिलपासून राज्यात मतदानाला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर अभिनेते आणि मक्कल नीधि मय्यम (MMM) या राजकीय पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी असे एक विधान केले आहे. ज्यामुळे त्यांचे चाहते अवाक् झाले आहेत. त्यांनी म्हटले की, राजकारण हे जनतेच्या सेवेसाठी एक उत्तम माध्यम आहे आणि जनतेची सेवा करताना जर चित्रपटांचा अडसर होत असेल तर ते सिनेसृष्टीतून कायमची निवृत्ती घ्यायला तयार आहेत.

कमल हासन यांनी नुकत्याच दिलेल्या एका भाषणात म्हणाले, मी देशातील त्या ३० टक्के लोकांपैकी एक होतो जे राजकारणापासून पुर्णपणे अलिप्त राहतात. मात्र परिस्थितीने मला राजकारणात येण्यास भाग पाडले. आता मी माझे संपूर्ण लक्ष जनतेच्या सेवेसाठी केंद्रित करणार आहे. जर हे काम करत असताना जर माझे सिने करिअर अडसर ठरत असेल तर मी सिनेइंडस्ट्री कायमची सोडून द्यायला तयार आहे. 
ते पुढे म्हणाले की, माझे विरोधक म्हणत आहेत की हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट आहे. काही दिवसांनी मी राजकारणातून गायब होईन. आता लोक ठरवतील कोणाला गायब करायचे ते.
कलम हासन यांच्या या विधानमुळे चाहते अवाक् झाले आहेत. कमल हासन कोईम्बतूर साऊथ वेस्ट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 

Web Title: Kamal Haasan ready to quit film for politics, says - '... then I will retire from Cineindustry forever'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.