कमल हासन पुन्हा एकदा म्हणणार ‘शाबाश नायडू’ !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2017 01:02 PM2017-01-03T13:02:19+5:302017-01-03T13:02:19+5:30
सुपरस्टार कमल हासनचा ‘शाबाश नायडू’ हा सिनेमा गेल्या सहा महिन्यांपासून रखडला होता. यामागे कारण होते, कमल हासनच्या पायाला झालेली ...
स परस्टार कमल हासनचा ‘शाबाश नायडू’ हा सिनेमा गेल्या सहा महिन्यांपासून रखडला होता. यामागे कारण होते, कमल हासनच्या पायाला झालेली दुखापत. पण आता कमल हासन पुन्हा एकदा कामावर परतणार आहे. म्हणजेच ‘शाबाश नायडू’च्या शूटींगला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या तिसºया आठवड्यापासून ‘शाबाश नायडू’चे शूटींग पुन्हा एकदा सुरु करण्याचा कमल यांचा बेत आहे. कमल अलीकडे लंडन येथून उपचार घेऊन परतला. शूटींगसाठी फिट असल्याचे लंडनच्या डॉक्टरांनी त्याला सांगितलेय. त्यामुळे येत्या काही दिवसांत ‘शाबाश नायडू’चे शूटींग पूर्ववत सुरु होणे अपेक्षित आहे. हैदराबाद येथे हे शूटींग होणार आहे.
‘शाबाश नायडू’ हा चित्रपट एकाचवेळी तामिळ, तेलगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये तयार होतायं यात राम्या कृष्णन, श्रुती हासनन आणि बह्मनंदम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
गतवर्षी जुलै महिन्यात चेन्नईतील आपल्या कार्यालयाच्या जिन्यावरून घसरल्याने कमलच्या पायाला दुखापत झाली होती. यानंतर त्याला लगेच रूग्णालयात हलवण्यात आले होते. यात त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला होता. नेमक्या यावेळी लंडन येथे होणा-या फिल्म फेस्टिवलमध्ये कमलला एका पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. मात्र पायाला झालेल्या दुखापतीमुळे तो या सोहळ्याला हजर राहू शकला नव्हता.
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये कमल व अभिनेत्री गौतमी यांचे १३ वर्षांपासूनचे ‘लिव्ह इन’ नाते संपुष्टात आले. खुद्द गौतमीनेच तिच्या ब्लॉगवरून हे जाहिर केले होते. कमल-गौतमीच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक बातमी होती. हे सबंध संपुष्टात येण्यामागचे नेमके कारण अद्यापही कमल वा गौतमीने स्पष्ट केलेले नाही. मात्र आमचा मार्ग आता एक राहिलेला नाही. त्यामुळे दोघांनीही वेगवेगळ्या मागार्नेच गेलेले बरे... , असे गौतमीने तिच्या ब्लॉगवर लिहिले होते. सोबतच हा निर्णय घेणे सोपे नव्हते, असेही तिने म्हटले होते.