​कमल हासनच्या आयुष्यातील महिला...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2016 04:25 PM2016-11-01T16:25:44+5:302016-11-06T10:46:49+5:30

गौतमीसोबतचे ‘लिव्ह इन’ नाते संपुष्टात आल्याने अभिनेता कमल हासन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतातील एक गुणी आणि लोकप्रीय ...

Kamal Hassan's women in life ...! | ​कमल हासनच्या आयुष्यातील महिला...!

​कमल हासनच्या आयुष्यातील महिला...!

googlenewsNext
तमीसोबतचे ‘लिव्ह इन’ नाते संपुष्टात आल्याने अभिनेता कमल हासन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतातील एक गुणी आणि लोकप्रीय अभिनेता अशी कमल हासन याची ओळख आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर कमलने असंख्य चाहते निर्माण केले. अभिनयाच्या क्षेत्रात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख व स्वतंत्र जागा निर्माण केली. मात्र त्याचवेळी खासगी आयुष्यात मात्र कमलला कधीच स्थैर्य लाभले नाही. प्रत्येक ‘रिलेशनशिप’ त्याने अनुभवले. म्हणजेच, कमलची अनेक प्रेम प्रकरणे राहिलीत. त्याने दोनदा लग्न केले. तो लिव्ह इनमध्येही राहिला. पण ही सर्व नाती अपयशीच ठरली. कमलचा विवाह संस्थेवर विश्वास नव्हता. आजही नाही. पण तरिही त्याने एकदा नाही तर दोनदा विवाह केला. हे दोन्ही विवाह अपयशी झाले. यानंतर कमल ‘लिव्ह इन’मध्ये राहिला. पण हेही नाते कमल टिकवू शकला नाही. गेल्या १३ वर्षांपासून कमल तामिळ अभिनेत्री गौतमीसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहत होता. पण अखेर हेही नाते तुटले. कदाचित कमलच्या आयुष्यात नवी कुणीतरी आली म्हणून तर नव्हे??

कमलच्या आयुष्यातील महिला...



१.  करिअरच्या अगदी पहिल्या टप्प्यावर कमलचे नाव तत्कालिन अभिनेत्री श्रीविद्यासोबत जोडले गेले. श्रीविद्या ही कमलपेक्षा वयाने मोठी होती. अनेक तामिळ व मल्याळम चित्रपटांमध्ये कमलने श्रीविद्यासोबत काम केले आणि याचदरम्यान तिच्या प्रेमात पडला. पण हे प्रेमसंबंध जितक्या लवकर जुळलेत तितक्याच लवकर तुटलेतही.



२. यानंतर शास्त्रीय नृत्यांगणा वाणी गणपथी हिची कमलच्या आयुष्यात एन्ट्री झाली. वाणी ही कमलच्या नात्यातही होती. वाणी आणि कमल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण कमल विवाह संस्थेवर विश्वास नव्हता आणि वाणी त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहायला तयार नव्हती. अखेर कमलने वाणीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण कमलच्या आयुष्यात सारिकाची एन्ट्री झाली आणि वाणीसोबतचा दहा वर्षांचा कमलचा संसार तुटला.



३. गुजराती अभिनेत्री अशी त्यावेळी सारिकाची ओळख होती. कालांतराने सारिका बॉलिवूडमध्येही आली. याच काळात कमल बॉलिवूडमध्ये आघाडीचा अभिनेता बनला होता. सारिका व कमल एकमेकांना भेटले आणि प्रेमात पडले. सारिकाने कमलवर कधीच लग्नासाठी दबाव टाकला नाही. काही वर्षांतच सारिकाने अभिनयाला रामराम ठोकत कमलच्या चित्रपटांमध्ये कॉस्च्युम डिझाईनर बनणे पसंत केले. सारिका कमलच्या प्रेमात अक्षरश: वेडी होती. विवाहापूर्वीच ती कमलच्या दोन मुलींची आई बनली. पण समाजाच्या दबावापुढे झुकत अखेर दोन मुली झाल्यानंतर सारिका व कमल यांनी विवाह केला.



 ४. सारिकासोबत संसार सुरु असताना कमल व त्याची को-स्टार गौतमी यांच्या प्रेमाच्या बातम्या येऊ लागल्या. अनेक वर्षे सारिकाला याची भणकही लागली नाही. पण सारिका असताना कमलच्या आयुष्यात ढवळाढवळ करणे गौतमीला नकोसे झाले आणि तिने दुसºया व्यक्तिसोबत संसाद थाटला. तोपर्यंत गौतमी व कमलचे नाते सारिकाला कळुन चुकले होते.



 ५. गौतमी गेल्यानंतर सिमरन बग्गा या सहअभिनेत्रीसोबतही कमलचे नाव जोडले गेले. सिमरन ही कमलपेक्षा २२ वर्षांनी लहान होती. या दोघांच्या प्रेम कहाणीची बरीच चर्चा झाली. हे नाते बरेच पुढेही गेले. गौतमी आणि नंतर सिमरन या दोघींसोबतच्या  नात्यामुळे अखेर सारिकाने कमलपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. २००४ मध्ये दोघांनीही घटस्फोट घेतला.



५. सारिका आयुष्यातून गेल्यावर  गौतमी पुन्हा एकदा कमलच्या आयुष्यात परतली. गौतमीचा विवाह अपयशी ठरला होता. एका मुलीची आई असलेल्या गौतमीला मानसिक आधार हवा होता. याच आधारापोटी तिने कमलला पुन्हा एकदा जवळ केले. दोघांनीही लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. गौतमीला कर्करोगाने ग्रासले. याकाळात कमलने तिला मोठा आधार दिला आणि गौतमी या आजारातून बाहेर पडली. तेव्हापासून आजपर्यंत गेली १३ वर्षे दोघेही लिव्ह इनमध्ये होते. पण अखेर हे नातेही संपुष्टात आले.

Web Title: Kamal Hassan's women in life ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.