Fat To Fit 'थलाइवी'साठी कंगणाने केले 70 किलो वजन ,आता 20 किलो वजन कमी करण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 06:00 IST2020-03-09T06:00:00+5:302020-03-09T06:00:00+5:30
'थलायवी'साठी तिचे वेगवेगळे लूक समोर पाहायला मिळतात.या सिनेमातील कंगणाचा अंदाजही अगदी निराळा असणार आहे.

Fat To Fit 'थलाइवी'साठी कंगणाने केले 70 किलो वजन ,आता 20 किलो वजन कमी करण्याचे आव्हान
बॉलीवुडची क्वीन अभिनेत्री कंगणा राणौतने विविध सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली आहेत. कंगणाच्या प्रत्येक सिनेमाची आणि भूमिकेची रसिकांमध्ये उत्सुकता असते. आता रसिकांना कंगणाच्या बहुप्रतिक्षित 'थलाइवी' सिनेमाची उत्सुकता आहे. दिवंगत पूर्व तमिलनाडुच्या मुख्यमंत्री जे जयललिता जयललिता यांच्यावरील 'थलाइवी' हा बायोपिक लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सिनेमाचे शूटिंग सुरू असून बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
प्रत्येक सिनेमात कंगणाच्या लूकनं फॅन्सची मनं जिंकलीत. थलायवीसाठी तिचे वेगवेगळे लूक समोर पाहायला मिळतात.या सिनेमातील कंगणाचा अंदाजही अगदी निराळा असणार आहे. सिनेमातील तिची प्रत्येक अदांवर तुम्हीही व्हाल फिदा.
या सिनेमासाठी ती खूप मेहनत घेत असून वेळोवेळी याची अपडेट ती चाहत्यांना देत असते. आता तिला भूमिकेची गरज म्हणून तिला 70 किलोपर्यंत वजन वाढवावे लागले. आता या सिनेमानंतर आगामी सिनेमा‘धाकड’ आणि ‘तेजस’च्या तयारीसाठी वजन कमी करत आहे. 2 महिन्यांत 20 किलो वजन कमी करणार आव्हान तिच्यासमोर आहे.
काही दिवसांपूर्वीच तिचे वजन 52 किलो होते आणि आता ती 70 किलोची झाली आहे. दररोज मेहनत करून दोनच महिन्यांत आपले वजन कमी करून फिट होण्याकडे तिचा जास्त कल आहे. सध्या शूटिंगच्या व्यस्त शेड्यूअलसह फॅट टू फिट होण्याची कंगणाची तयारीही तितकीच रंजक असणार हे मात्र नक्की.