Kangana Ranaut : तुमचं खरं नाव वेगळंच, इतकं सुंदर नाव का लपवता? कंगनाने महेश भट यांच्यावर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 11:43 IST2022-09-05T11:42:48+5:302022-09-05T11:43:19+5:30
Kangana Ranaut : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने अनेकांवर खळबळजनक आरोप केलेत. आता कंगनाच्या निशाण्यावर आले आहे ते दिग्दर्शक महेश भट. होय, कंगनाने महेश भट यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

Kangana Ranaut : तुमचं खरं नाव वेगळंच, इतकं सुंदर नाव का लपवता? कंगनाने महेश भट यांच्यावर साधला निशाणा
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut ) तिच्या चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने अनेकांवर खळबळजनक आरोप केलेत. आता कंगनाच्या निशाण्यावर आले आहे ते दिग्दर्शक महेश भट (Mahesh Bhatt). होय, कंगनाने महेश भट यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. यात मुकेश भट मुस्लिम जनतेला संबोधित करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत, कंगनाने महेश भट यांच्यावर खरं नाव लपवण्याचा आरोप केला आहे.
कंगनाने काल रविवारी आपल्या इन्स्टास्टोरीत हा व्हिडीओ शेअर केला आणि सोबत त्यांच्यावर अनेक आरोप केलेत.
काय म्हणाली कंगना?
मला सांगण्यात आलं की, महेश भट यांचं खरं नाव अस्लम आहे. त्यांनी सोनी राजदानशी लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलला. इतकं सुंदर नाव ते का लपवतात? त्यांनी आपलं खरं नाव वापरावं. जो धर्म स्वीकारला त्याचं त्यांनी प्रतिनिधित्व करायला नको, अशा आशयाची इन्स्टा स्टोरी कंगनाने शेअर केली आहे.
तुम्हाला ठाऊक असेलच की, कंगनाने 2006 मध्ये महेश भट यांच्याच ‘गँगस्टर’ चित्रपटातून डेब्यू केला होता. यानंतर भट कॅम्पच्या वो लम्हे, राज-द मिस्ट्री कंटीन्यू या चित्रपटातही काम केलं. याआधी कंगनाने महेश भट यांच्यावर चप्पल फेकून मारल्याचा आरोप केला होता.
महेश भट यांनी फेकून मारली होती चप्पल!
सोनी राजदान यांच्या ट्वीटला उत्तर देताना कंगनाची बहीण रंगोलीने महेश भट यांच्यावर आरोप केला होता. ‘प्रिय सोनीजी, महेश भट यांनी कंगनाला बे्रक दिलेला नाही तर अनुराग बासूने दिला. महेश भट यांनी त्या चित्रपटात क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम केले होते. धोखा या चित्रपटात काम करण्यास कंगनाने नकार दिल्यामुळे महेश भट संतापले होते. त्यांनी कंगनाला नाही नाही ते सुनावले होते. लम्हेच्या प्रिव्यूदरम्यान महेश भट यांनी 19 वर्षांच्या कंगनाला चप्पल फेकून मारली होती. त्यांनी कंगनालाच तिचा चित्रपट पाहू दिला नव्हता. यानंतर माझी बहीण रात्रभर रडली होती, असे रंगोलीने म्हटलं होतं.
महेश भट यांनी कंगनाला चप्पल फेकून मारली होती, या रंगोलीच्या खुलाशाने खळबळ माजली होती.