Nirbhaya Case : अशा महिलांच्या पोटीच असे बलात्कारी जन्म घेतात...; कोणावर भडकली कंगना राणौत?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 10:43 AM2020-01-23T10:43:27+5:302020-01-23T10:44:42+5:30

Nirbhaya Case : ...आणि कंगना राणौत भडकली

kangana ranaut anger at indira jaising said such women are born rapists | Nirbhaya Case : अशा महिलांच्या पोटीच असे बलात्कारी जन्म घेतात...; कोणावर भडकली कंगना राणौत?

Nirbhaya Case : अशा महिलांच्या पोटीच असे बलात्कारी जन्म घेतात...; कोणावर भडकली कंगना राणौत?

googlenewsNext
ठळक मुद्देकंगना सध्या ‘पंगा’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

आपल्या परखड वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारी कंगना राणौत आता ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांच्यावर बरसली आहे. होय, एका पत्रकार परिषदेत, ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांच्यावर भडकली. निर्भयाच्या आईने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे अनुकरण करून दोषींना माफ करावे, असा अजब सल्ला  ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईला दिला होता. या पार्श्वभूमीवर कंगनाला पत्रकार परिषदेत यावरचे तिचे मत विचारण्यात आले आणि कंगना भडकली.


 ‘ इंदिरा जयसिंह यांच्यासारख्या अशा महिलांनाच या बलात्का-यांसोबत चार दिवस जेलमध्ये ठेवायला हवे. त्यानंतर त्यांना समजेल. इंदिरा जयसिंह सारख्या महिलांच्या पोटीच असे बलात्कारी जन्म घेतात. माझ्या मते, बलात्का-यांना  भरचौकात फाशी द्यायला हवी’, असे कंगना म्हणाली.

 या आरोपींना शिक्षा देण्यासाठी केल्या जाणा-या विलंबावरही तिने नाराजी व्यक्त केली. अशा लोकांना सर्वांसमोर फाशी द्यायला हवी म्हणजे इतरांना त्यातून कायद्याचा धाक निर्माण होईल. निर्भयाचे आई-वडील इतक्या वर्षांपासून आपल्या मुलीला गमावल्याचे दु:ख सहन करत आहे. अशात या दोषींना शांतपणे मारण्याचा काय फायदा. आपण अशाप्रकारे आरोपींना मारुन कोणतेही उदाहरण सेट करु शकत नाही. त्यामुळे या दोषींना भरचौकात फासावर चढवायला हवे, असेही ती म्हणाली.
दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टाने निर्भया रेप केसमधील दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील दोषींना 1 फेब्रुवारीला पहाटे 6 वाजता फाशी दिली जाणार आहे.
कंगना सध्या ‘पंगा’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

Read in English

Web Title: kangana ranaut anger at indira jaising said such women are born rapists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.