कंगना रणौतने योगी आदित्यनाथांच्या एका खास निर्णयाचं केल स्वागत, - म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 01:19 PM2020-09-19T13:19:35+5:302020-09-19T13:29:38+5:30

योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, आग्र्याच्या मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव दिलं जाईल. आता कंगनाने योगी आदित्यनाथ यांना टॅक करून एका खास गोष्टीसाठी त्यांचं कौतुक केलंय.

Kangana Ranaut applaud CM Yogi Adityanath for new announcement | कंगना रणौतने योगी आदित्यनाथांच्या एका खास निर्णयाचं केल स्वागत, - म्हणाली....

कंगना रणौतने योगी आदित्यनाथांच्या एका खास निर्णयाचं केल स्वागत, - म्हणाली....

googlenewsNext

कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर सतत सक्रिय आहे आणि एकामागून एक ट्विट करत आहे. अनके वादग्रस्त ट्विटदरम्यान कंगनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका निर्णयाचं स्वागत केलंय. योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, आग्र्याच्या मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव दिलं जाईल. आता कंगनाने योगी आदित्यनाथ यांना टॅक करून एका खास गोष्टीसाठी त्यांचं कौतुक केलंय.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज आहे. उत्तर प्रदेशात एक चांगली फिल्म सिटी तयार केली जाईल. फिल्स सिटीद्वारे निर्मात्यांना पर्याय दिले जातील. कंगनाने योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयाच स्वागत केलंय.

कंगनाने योगी आदित्यनाथ यांना टॅग करत लिहिले की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये बदलाची गरज आहे. लोकांचा असा समज आहे की भारतातील टॉप फिल्म इंडस्ट्री हिंदी फिल्म इंडस्ट्री आहे. पण असं नाहीये. टॉप पोजिशनवर तेलुगू फिल्म इंडस्ट्री आहे.

एका दुसऱ्या ट्विटमध्ये कंगनाने लिहिले की, 'मी योगी आदित्यनात यांच्या या निर्णयाचं स्वागत करते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये बदलाची गरज आहे. सर्वातआधी आपल्याला एक अशी मोठी फिल्म इंडस्ट्री  हवी आहे जिला भारतीय फिल्म इंडस्ट्री म्हटलं जाईल.  आपण अनेक गोष्टींमध्ये विभागले गेलो आहोत. ज्याचा फायदा हॉलिवूडला मिळतो. एक इंडस्ट्री, पण अनेक फिल्म सिटीज'.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपासून कंगना रणौत सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. ड्रग्स आणि नेपोटिज्मच्या मुद्द्यावर ती बॉलिवूडमधील कलाकारांवर सतत हल्ला करत आहे. महाराष्ट्र सरकारसोबतही तिने वाद घातला आहे. तसेच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सोबतही तिने वाद घातला. दरम्यान कंगना म्हणाली की, ती कधीही भांडणाला सुरूवात करत नाही. पण संपवते तीच. अशात मी भांडणाला सुरूवात करते हे जर कुणी सिद्ध केलं तर मी ट्विटर सोडेन असंही ती म्हणाली.

उर्मिलावर वार करून कंगना एकाकी

कंगनाने ऊर्मिला मातोंडकराला ‘सॉफ्ट पोर्नस्टार’ म्हटल्याने तिच्यावर चौफेर टीका होत आहे. कंगनाला दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी उर्मिला अष्टपैलू अभिनेत्री आहे, असे म्हणून उत्तर दिले. ऊर्मिलानेही ट्विटकरून वर्मा आणि आपल्या चाहत्यांचे आभार मानले. कंगनाने मात्र आपण स्वत:हून कधीच भांडत नाही, असा दावा आता केला आहे. मी भांडखोर असल्याचे कोणी सिद्ध केल्यास मी स्वत:हून ट्विटटर सोडेन, असे म्हटले.

आपल्याला भाजपला मतदान करायचे होते, पण भाजप उमेदवार नसल्याने आपण नाइलाजाने शिवसेनेला मत दिले, असे कंगना एका मुलाखतीत म्हणाली. त्यावर ती जिथे मतदान करते, तिथे लोकसभा आणि विधानसभेला भाजपचाच उमेदवार होता, असे एका पत्रकाराने लक्षात आणून दिले. त्यामुळे कंगना भडकली आणि तुम्ही चुकीची माहिती देत आहात, मी तुम्हाला कोर्टात खेचेन, तुरुंगात धाडेन, अशी धमकी ट्विटरवरून दिली.

कंगनाचे ट्विट पाहिल्यानंतर स्टॅँडअप कॉमेडियन आणि लेखक अभिजित गांगुली यांनी तिला ट्विटर सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी लिहिले की, कृपया ट्विटटर सोडून द्या. त्यामुळे कोरोना युद्धातील डॉक्टरांचे मृत्यू, स्थलांतरित मजुरांचे प्रश्न, बेरोजगारीचे संकट, घसरलेला जीडीपी या देशापुढील खऱ्या व गंभीरवर परिस्थिवर लक्ष केंद्रित होईल. कंगनाने अभिजीत गांगुली यांच्यावर पलटवार करीत लिहिले की, ‘ते (सोनम आणि दिया) हत्याचे आरोपी ड्रग्स घेणाऱ्यांसाठी लढत होते. माझे नाव मुद्दाम त्यात समाविष्ट करण्यात आले.

अनुराग कश्यपने सुनावले

आपण क्षत्रिय असल्याचे टिष्ट्वट कंगनाने केले होते. त्यावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपने कंगनाला चीनविरोधात लढाई करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे संतापून कंगनाने अनुरागना तुम्ही मंदबुद्धीचे आहात, बी ग्रेड चित्रपट काढता, असे असे ट्विट केले.

हे पण वाचा :

अनिच्छेने शिवसेनेला मतदान करावे लागल्याचे कंगनाचे विधान चुकीचे - पत्रकारांचा आरोप

कंगना-उर्मिला वादात सनीची एंट्री, पॉर्न स्टार कमेंटवरुन लगावला टोला

'रुदाली' म्हटल्याने वाईट वाटलं असेल तर मी कंगनाची माफी मागायला तयार' - उर्मिला मातोंडकर

'भांडणाची सुरूवात मी करत नाही, पण संपवते मीच', कंगना रणौतचा शिवसेनेला इशारा?

Web Title: Kangana Ranaut applaud CM Yogi Adityanath for new announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.