कंगना राणौतने ‘या’ बायोपिकसाठी मागितले २४ कोटी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 07:03 PM2019-03-24T19:03:29+5:302019-03-24T19:04:20+5:30

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून आपण कंगना राणौत हिला ओळखतो. कोणत्या ना कोणत्या कारणाने ती कायम चर्चेत असल्याचे आपण पाहतो. मध्यंतरी ती ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ  झाँसी’ या चित्रपटामुळे चर्चेत होती तर आता तिने एका बायोपिकसाठी  २४ कोटी फी म्हणून मागितलेल्या रकमेमुळे चर्चेत आलीय.

 Kangana Ranaut asked for 'this' biopic 24 crore? | कंगना राणौतने ‘या’ बायोपिकसाठी मागितले २४ कोटी?

कंगना राणौतने ‘या’ बायोपिकसाठी मागितले २४ कोटी?

googlenewsNext

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून आपण कंगना राणौत हिला ओळखतो. कोणत्या ना कोणत्या कारणाने ती कायम चर्चेत असल्याचे आपण पाहतो. मध्यंतरी ती ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ  झाँसी’ या चित्रपटामुळे चर्चेत होती तर आता तिने एका बायोपिकसाठी  २४ कोटी फी म्हणून मागितलेल्या रकमेमुळे चर्चेत आलीय. खरं पाहिलं तर एवढी रक्कम अद्याप कुठल्या अभिनेत्यालाही देण्यात आली नसावी. पण, ती कंगना आहे, तिला पाहिजे ती नक्की करूनच घेते, नाही का?

 अभिनेत्री कंगना राणौत हिने अलीकडेच सांगितले होते की, ती तामिळनाडूच्या पूर्व मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर बनत असलेल्या बायोपिक चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाला तमिळ भाषेत ‘थलायवी’ आणि हिंदी भाषेत ‘जया’ या नावाने रिलीज करण्यात येईल, असे ठरले. आता बातमी अशी आहे की, कंगनाने म्हणे जयललिताची भूमिका साकारण्यासाठी तब्बल २४ कोटी रूपयांची भरभक्कम फी मागितली आहे.

कंगनाला सध्या बॉलिवूडमध्ये सर्वांत जास्त फी आकारणारी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. सुत्रांनुसार, दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या  या चित्रपटांसाठी तिने मागितलेली २४ कोटींची रक्कम ही योग्य असल्याचे निर्माते समजत आहेत. कंगनाचा हा चित्रपट संपूर्ण भारतात पाहिला जाईल, यात काही शंका नसल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. जेव्हा उत्तर भारतातील एखादा कलाकार साऊथमध्ये चित्रपट करतात तेव्हा त्यामध्ये इतरही कलाकार असतात, पण या चित्रपटात मात्र केवळ कंगनाच मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय. 

Web Title:  Kangana Ranaut asked for 'this' biopic 24 crore?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.