एका ट्विटने ‘पंगा क्विन’ भडकली; लसीवरून कंगना राणौत व चेतन भगत यांच्यात जुंपली  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 12:38 PM2021-04-29T12:38:09+5:302021-04-29T12:38:40+5:30

Kangana Ranaut attacks writer Chetan Bhagat :  चेतन भगत यांच्या एका ट्विटमुळे कंगना अशी काही संतापली की, उत्तरात तिने भगत यांना ‘परजीवी’ न बनण्याचा सल्ला दिला.

kangana ranaut attacks writer chetan bhagat as he supports pfizer and moderna vaccines over indian vaccines | एका ट्विटने ‘पंगा क्विन’ भडकली; लसीवरून कंगना राणौत व चेतन भगत यांच्यात जुंपली  

एका ट्विटने ‘पंगा क्विन’ भडकली; लसीवरून कंगना राणौत व चेतन भगत यांच्यात जुंपली  

googlenewsNext
ठळक मुद्देदेशात कोरोनामुळे दहशतीचे वातावरण आहे. देशात विविध राज्यातील लोक बेड, औषध, ऑक्सिजन आणि व्हॅक्सिनचा तुडवडा सहन करत आहेत.

देशात कोरोनामुळे दहशतीचे वातावरण आहे. देशात विविध राज्यातील लोक बेड, औषध, ऑक्सिजन आणि व्हॅक्सिनचा तुडवडा सहन करत आहेत. अनेक लोकांनी यासाठी सरकारला जबाबदार धरले आहे. अशात कंगना राणौतसारखे ( Kangana Ranaut ) काही लोक सतत महामारीशी संबंधित गोष्टी ट्विट करत, सरकारच्या प्रयत्नांबद्दल सांगते आहे. इतकेच नाही तर मोदी सरकारवर टीका करणा-यांनाही शिंगावर घेतेय. आता कंगनाने कोणाला शिंगावर घेतले तर सुप्रसिद्ध लेखक व निर्माता चेतन भगत यांना. चेतन भगत (Chetan Bhagat) यांच्या एका ट्विटमुळे कंगना अशी काही संतापली की, उत्तरात तिने भगत यांना ‘परजीवी’ न बनण्याचा सल्ला दिला.
कंगना व चेतन भगत यांच्यात जुंपली ती लसीबद्दलच्या एका ट्विटमुळे. चेतन भगत यांनी आपल्या ट्विटमध्ये फायजर व मॉडर्ना लसीचा वापर न करण्याबद्दल सरकारला धारेवर धरले आणि नेमक्या त्यांच्या याच ट्विटमुळे कंगना भडकली. ( Kangana Ranaut attacks writer Chetan Bhagat )

चेतन भगत यांचे ट्विट


फायजर व मॉडर्ना सर्वात चांगल्या लसी आहेत. डिसेंबर 2020 पासून त्या बाजारात उपलब्ध आहेत. मग असे असताना त्या भारतात उपलब्ध का नाही? काय आपण ‘बेस्ट’च्या लायक नाही का? आपण सुरक्षा सामग्री विदेशातून खरेदी करत नाही का? ही युद्धासारखी स्थिती नाही का? लस फक्त भारतालीच का? असे अनेक सवाल चेतन भगत यांनी आपल्या ट्विटमध्ये उपस्थित केलेत.

कंगनाचे उत्तर


चेतन भगत यांच्या या ट्विटला कंगनाने उत्तर दिले. ‘ते (विदेशी लसी) सर्वोत्कृष्ट आहेत, हे कुणी सांगितले? माझ्या अनेक मित्रांनी फायजर लस घेतली आणि त्यांना ताप व अंगदुखीचा त्रास सहन करावा लागतोय. तुम्ही लोक भारत आणि भारतीयांबद्दल द्वेष पसरवणे बंद करणार का? संपूर्ण जगात आपल्या लसीला मागणी आहे आणि आत्मनिर्भर भारताचा अर्थ आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देणे आहे. अशात तुम्ही परजीवी बनणे बंद करा,’ अशा शब्दांत कंगनाने चेतन भगत यांना सुनावले.
 

Web Title: kangana ranaut attacks writer chetan bhagat as he supports pfizer and moderna vaccines over indian vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.