"दोन शरीर एक जीव...", कंगणा राणौतची बहिण रंगोलीसाठी हृदयस्पर्शी पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 05:34 PM2024-12-02T17:34:01+5:302024-12-02T17:34:44+5:30
कंगनाने आता बहिण रंगोलीच्या वाढदिवशी तिच्यासाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.
बॉलिवूडची 'पंगा गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत ही तिच्या स्पष्टवक्त्या, बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. घराच्यांचा किंवा इंडस्ट्रीतील कोणत्याही मोठ्या व्यक्तींचा पाठिंबा नसताना तिने सिनेसृष्टीत आपले स्थान निर्माण केले. यानंतर राजकारणातही तिने वेगळं स्थान बनवलं. तिच्या या संपुर्ण प्रवासात कंगनाच्यासोबत होती ती म्हणजे ती बहिण रंगोली. कंगनाच्या पाठीशी खंबीरपणे रंगोली उभी होती.
कंगनाने आता बहिण रंगोलीच्या वाढदिवशी तिच्यासाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. "माझी एकुलती बहिण, दोन शरीर एक जीव", या शब्दात कंगनाने रंगोलीला शुभेच्छा दिल्या. कंगनाचं तिच्या बहिणीवर खूप प्रेम आहे. दोघींचं बॉन्डिंग खूप छान आहे.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा 'इमर्जन्सी' सिनेमा येत्या नवीन वर्षात १७ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. आणीबाणीच्या घटनेपासून प्रेरित असलेल्या 'इमर्जन्सी' चित्रपटात कंगना राणौतने मुख्य भूमिका साकारली आहे. यासोबतच या अभिनेत्रीने चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारीही पार पाडली आहे. चित्रपटाची कथा 1975 ते 1977 या काळात लादलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. 21 महिन्यांची आणीबाणी ही भारताच्या इतिहासातील महत्त्वाची बाब मानली जाते.