कंगना राणौतचं वादग्रस्त विधान; ममता बॅनर्जींना म्हणाली, ‘रक्तपिपासू राक्षसीण’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 10:34 AM2021-05-04T10:34:08+5:302021-05-04T10:36:55+5:30
Kangana Ranaut Tweets : त्राटिकेसोबत केली ममतांची तुलना, मोदींना दिला ‘सुपर गुंडई’ करण्याचा सल्ला
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut ) सध्या तिच्या सिनेमांपेक्षा सोशल मीडियावरच्या टिवटिवीमुळे चर्चेत आहे. कंगना भाजपाची किती कट्टर समर्थक आहे, हे आताश: कुणापासूनही लपून राहिलेले नाही. अशात पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर कंगनाचे ट्विट येणे अपेक्षितच म्हणायला हवे. त्यानुसार, ते आले़ ममतांचा (Mamata Banerjee) दणदणीत विजय आणि भाजपाचा पराभव या पार्श्वभूमीवर कंगनाने अनेक ट्विट्स केले. पण तिच्या विचित्र ट्विट्समुळे ती जबरदस्त ट्रोल होतेय.
त्राटिकेसोबत केली ममतांची तुलना
कंगनाने आज सकाळी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तिने ममता बॅनर्जींची तुलना त्राटिका या राक्षसीसोबत केली. निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये भडकलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या ट्विटमध्ये तिने लिहिले, ‘मी चूक होती. ती रावण नाही. रावण महान राजा होता. त्याने जगातील सर्वात श्रीमंत देश निर्माण केला होता. महान प्रशासक, बुद्धिमान, वीणावादक असा शक्तिशाली राजा होता. पण ही रक्ताची भुकेली राक्षसीण त्राटिका आहे. ज्या लोकांनी हिला मत दिले, त्यांचेही हात रक्ताने माखलेले आहेत.’
याआधी केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने ममता बॅनर्जींची तुलना रावणाशी केली होती.
मोदींना दिला ‘सुपर गुंडई’ करण्याचा सल्ला
कंगनाने आणखी एक ट्विट केले. यामध्ये कंगनाने अगदी खुल्लेआम पंतप्रधान मोदींना पश्चिम बंगालमध्ये ‘सुपर गुंडई’ (गुंडगिरी) करण्याचा सल्ला दिला. इतकेच नाही तर सन 2000 वर्षाच्या सुरूवातीला दाखवले तसे ‘विराट रूप’ दाखवण्याचे आवाहनही तिने मोदींना केले.
होतेय ट्रोल
Did you just declare that.. 2002 was done by Modi?
— Riddhi (@pikachu_peeka) May 3, 2021
Inciting ri0ts hawwww
Shame on you Kangana
.@twitter kangana is referring to the Gujarat genocide. She is inciting violence, she is repeat offender! Why is she not yet banned?
— أمينة Amina (@AminaaKausar) May 3, 2021
या ट्विट्समुळे कंगना जबरदस्त ट्रोल होतेय. लोकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी कंगनाला मेंटल, पागल म्हटले आहे तर काहींनी ती हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे. अनेकांनी कंगनाचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्याची मागणीही केली आहे.