म्हणे, मीच या ग्रहावरची सर्वोत्तम अभिनेत्री...! ट्रोलर्सने घेतली कंगनाची मजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 15:48 IST2021-02-09T15:47:53+5:302021-02-09T15:48:22+5:30

होय, आता कंगनाने स्वत:च स्वत:ला या पृथ्वीवरच्या सर्वोत्तम अभिनेत्रीचाा किताब दिलाय.

kangana ranaut calls herself globes brilliant actress people started trolling her | म्हणे, मीच या ग्रहावरची सर्वोत्तम अभिनेत्री...! ट्रोलर्सने घेतली कंगनाची मजा

म्हणे, मीच या ग्रहावरची सर्वोत्तम अभिनेत्री...! ट्रोलर्सने घेतली कंगनाची मजा

ठळक मुद्देकंगनाच्या या ट्वीटनंतर ट्रोलर्स अ‍ॅक्टिव्ह झालेत. मग त्यांनी कंगनाचे जुने फोटो शोधून ते पोस्ट करण्याचा धडाका लावला.

कंगना राणौत म्हणजे एक आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेली अभिनेत्री. पण कधीकधी अतिआत्मविश्वासामुळे ती ट्रोलही होते. आता तर कंगनाने स्वत:च स्वत:ला या पृथ्वीवरच्या सर्वोत्तम अभिनेत्रीचाा किताब दिलाय. होय, या ग्रहावरच्या कोणत्याही अभिनेत्री माझ्याइतकी पात्रता व प्रतिभा नाही, असे ट्वीट तिने केले. आता या ट्वीटनंतर ट्रोलर्स ट्रोल करणार नाहीत तर नवल.

आपल्या ट्वीटमध्ये कंगनाने स्वत:ची तुलना मेरिल स्ट्रीप व गल गडोटशी केली आहे. तिने लिहिले, ‘एक कलाकार म्हणून मी इतके वैविध्य दाखवले, तितके या ग्रहावरच्या कोणत्याही दुस-या अभिनेत्रीला आत्तापर्यंत दाखवता आले नाही. लेअर्ड भूमिका दाखवण्यासाठी माझ्याकडे मेरिल स्ट्रीप सारखे रॉ टॅलेंट आहे आणि अ‍ॅक्शन व ग्लॅमरसाठी गल गडोटसारखी प्रतिभा आहे.’ आपल्या या ट्वीटसोबत तिने ‘थलायवी’ व ‘धाकड’ या सिनेमांचे फोटो शेअर केलेत.

दिले चॅलेंज

या ग्रहावर कोणत्याही अन्य अभिनेत्रीत माझ्यापेक्षा अधिक वैविध्यपूर्ण भूमिका व प्रतिभा साकारण्याची प्रतिभा असेल तर मी माझा अहंकार सोडून देईल. तोपर्यंत मात्र मी या अभिमानातच जगण्याचा आनंद घेणार आहे, अशा शब्दांत तिने खुले आव्हानही दिले.

ट्रोलर्स अ‍ॅक्टिव्ह

कंगनाच्या या ट्वीटनंतर ट्रोलर्स अ‍ॅक्टिव्ह झालेत. मग त्यांनी कंगनाचे जुने फोटो शोधून ते पोस्ट करण्याचा धडाका लावला. काहींनी मणिकर्णिकाचे फोटो शोधून काढले. नकली घोड्यावर सीन्स दिल्यामुळे मणिकर्णिकाच्या वेळी कंगना प्रचंड ट्रोल झाली होती. एका चाहत्याने कंगनाची मजा घेत लिहिले, ‘इतकी का बडबडतेस. आम्ही आधीच तुझे फॅन्स आहोत. असे करून नवे फॅन्स मिळणार नाहीत.’

Web Title: kangana ranaut calls herself globes brilliant actress people started trolling her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.