तुमचे जगणे मुश्किल करेल...! ट्विटर अकाऊंटवरच्या निर्बंधामुळे भडकली कंगना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 03:50 PM2021-01-20T15:50:42+5:302021-01-20T15:51:18+5:30

ट्विटरने कंगनाच्या ट्विटर अकाऊंटवर काही प्रमाणात निर्बंध लादले आणि कंगना नेहमीसारखी भडकली.

kangana ranaut claims her twitter account temporarily restricted | तुमचे जगणे मुश्किल करेल...! ट्विटर अकाऊंटवरच्या निर्बंधामुळे भडकली कंगना

तुमचे जगणे मुश्किल करेल...! ट्विटर अकाऊंटवरच्या निर्बंधामुळे भडकली कंगना

googlenewsNext
ठळक मुद्देकाल कंगनाने ‘तांडव’ या वेबसीरिजच्या वादात उडी घेत सैफ अली खान व दिग्दर्शक अली जब्बास जफरवर तीव्र शब्दांत टीका केली होती.

‘धाकड’ अभिनेत्री कंगना राणौत सोशल मीडियावर सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. मुद्दा कुठलाही असो तिची टिवटिव ठरलेली. यावरून कंगना अनेकदा ट्रोलही झाली. पण कंगनाने ‘पंगा’ घेणे सोडले नाही. पण काल-परवा ट्विटरने कंगनाच्या ट्विटर अकाऊंटवर काही प्रमाणात निर्बंध लादले आणि कंगना नेहमीसारखी भडकली.
कंगनाने थेट ट्विटर चे सीईओ जॅक डोर्से यांच्यावर घसरली. तिने  ट्विट करत आपला संताप व्यक्त केला. ‘लिबरल लोक चाचा जॅकसमोर रडले आणि माझ्या अकाऊंटवर काही काळासाठी निर्बंध लावण्यात आले. ते मला धमक्याही देत आहेत. माझे अकाऊंट/ माझी आभासी ओळख देशासाठी कधीही शहीद होईल. मात्र माझे रिलोडेड देशभक्त व्हर्जन चित्रपटांद्वारे वापसी करेन. तुमचे जगणे मी मुश्किल होईल,’ असे ट्विट कंगनाने केले.


काल कंगनाने ‘तांडव’ या वेबसीरिजच्या वादात उडी घेत सैफ अली खान व दिग्दर्शक अली जब्बास जफरवर तीव्र शब्दांत टीका केली होती. ‘कारण भगवान श्रीकृष्णानेही शिशुपालच्या 99 चुका माफ केल्या होत्या... आधी शांती, मग क्रांती... यांचे शिर धडावेगळे करण्याची वेळ आली आहे, जय श्रीकृष्ण,’ असे ट्विट कंगनाने केले होते. तिच्या ट्विटची अनेकांनी निंदा केली होती. हे ट्विट हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे असल्याची तक्रार करत अनेकांनी ट्विटर ला रिपोर्ट केला होता. वाद वाढत असलेला पाहून कंगनाने नंतर हे ट्विट डिलीटही केले होते.

अलीकडे कंगना ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांच्यावर अशीच बरसली होती. कंगनाने  जॅक डोर्सी यांचे 5 वर्षांपूवीर्चे ट्विट शोधून त्यांच्यावर मुस्लिम राष्ट्र आणि चीनी खुशमस्क-यांना विकले गेल्याचा आरोप केला होता.  
होय, ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट अस्थायी रूपाने बंद केले,यामुळे कंगना भडकली होती. ‘ट्विटर अभिव्यक्ति स्वातंत्र्यासोबत आहे. सत्य बोलणा-याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत,’असे ट्विट जॅक डोर्सी यांनी 5 वर्षांपूर्वी केले होते. मात्र कंगनाने त्यांच्या या ट्विट आणि एकूणच ट्विटरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

Web Title: kangana ranaut claims her twitter account temporarily restricted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.