'धाकड'च्या नव्या पोस्टरमध्ये डॅशिंग अवतारात दिसली कंगना राणौत, रिलीज डेट आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 07:26 PM2021-01-18T19:26:04+5:302021-01-18T19:26:30+5:30

कंगना रणौतचा आगामी चित्रपट 'धाकड' लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Kangana Ranaut in dashing avatar in new poster of 'Dhakad', release date revealed | 'धाकड'च्या नव्या पोस्टरमध्ये डॅशिंग अवतारात दिसली कंगना राणौत, रिलीज डेट आली समोर

'धाकड'च्या नव्या पोस्टरमध्ये डॅशिंग अवतारात दिसली कंगना राणौत, रिलीज डेट आली समोर

googlenewsNext

कंगना रणौतचा आगामी चित्रपट 'धाकड' लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या कंगना या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि यादरम्यान तिने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले असून त्या पोस्टरमध्ये कंगनाच्या हातात तलवार आणि जवळच मृतदेह पडलेले दिसत आहेत. 'धाकड'मधील कंगनाचा डॅशिंग लूक चाहत्यांना भावतो आहे.

कंगना राणौतने 'धाकड'चे पोस्टर शेअर करत लिहिले की, निर्भय आणि क्रूर आहे. भारताचा पहिला महिला लीड अ‍ॅक्शन चित्रपट १ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रदर्शित होईल.

कंगना सध्या भोपाळमध्ये तिच्या आगामी धाकड चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला होता. भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या. त्याची मागणी होती की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे. मात्र, कंगना या आंदोलनाला न घाबरता शूटिंग करत आहे. इथे ती धाकडचे अ‍ॅक्शन सीन येथे शूट करते आहे.


कंगना राणौतने नुकतीच 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिद्दा' चित्रपटाची घोषणा केली आहे. यात ती काश्मीरची राणी 'दिद्दा'ची भूमिका साकारणार आहे; पण चित्रपटाच्या घोषणेनंतर आता कंगनावर चोरीचा आरोप झाला आहे.  कंगना राणौतने 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिद्दा' चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप 'दिद्दा'चे लेखक आशिष कौल यांनी केला आहे. ते म्हणाले, की स्वतः च्या हक्कांसाठी संघर्ष करणारी कंगना माझ्यासारख्या लेखकाच्या हक्कांचे उघडपणे उल्लंघन करते आहे. तिने कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केले असून हे बेकायदेशीर आहे. मला कंगनाचे वागणे समजले नाही. मी याला बौद्धिक चोरी म्हणेल.

Web Title: Kangana Ranaut in dashing avatar in new poster of 'Dhakad', release date revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.