कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची रिलीज डेट पोस्टपोन, म्हणाली, 'हा फक्त चित्रपट नाही तर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 01:57 PM2023-10-16T13:57:11+5:302023-10-16T13:57:57+5:30

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना रणौत दिसणार आहे.

kangana ranaut declares her next movie emergency release date postponed to next year | कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची रिलीज डेट पोस्टपोन, म्हणाली, 'हा फक्त चित्रपट नाही तर...'

कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची रिलीज डेट पोस्टपोन, म्हणाली, 'हा फक्त चित्रपट नाही तर...'

अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) बहुप्रतिक्षित सिनेमा 'इमर्जन्सी' (Emergency) ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नोव्हेंबर महिन्यात चित्रपट रिलीज होणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र आता प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा सिनेमा पुढच्या वर्षीच रिलीज होणार असल्याची माहिती कंगनाने ट्विटरवर दिली आहे.

कंगना रणौत स्टारर फिल्म 'इमर्जन्सी' यावर्षी रिलीज होणार आहे. रिलीज डेट पोस्टपोन करण्यात आली आहे. याविषयी कंगनाने ट्विटरवर लिहिले,'प्रिय मित्रहो, मला एक महत्वाची घोषणा करायची आहे. इमर्जन्सी हा सिनेमा म्हणजे एक कलाकार म्हणून माझ्या आयुष्यभराची पुंजी आहे. हा फक्त सिनेमा नाही तर एक माणूस म्हणूनही माझी परीक्षा आहे. तुम्ही सिनेमाच्या टीझर आणि पोस्टरला उत्तम प्रतिसाद दिलात त्यामुळे आम्ही भारावलो आहोत. मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देते.'

ती पुढे लिहिते, 'मी कुठेही गेले की मला इमर्जन्सीच्या रिलीजविषयी विचारण्यात येतं. आधी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख २४ नोव्हेंबर ठरली होती. पण माझ्या एका मागोमाग रिलीज झालेल्या सिनेमांमुळे आणि बदलत्या तारखांमुळे २०२४ च्या शेवटपर्यंत तारखा फुल आहेत. म्हणूनच इमर्जन्सी सिनेमा पुढच्या वर्षीपर्यंत पोस्टपोन करण्यात आला आहे. प्रदर्शनाची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत आमच्यासोबत जोडलेले राहा. सिनेमासाठीचा तुमचा उत्साह खूप महत्वाचा आहे.'

'इमर्जन्सी' बद्दल सांगायचं तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना रणौत दिसणार आहे. 1975 मध्ये इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी यावर कथा आधारित असणार आहे. सिनेमात अनुपम खेर, श्रेयस तळपदे यांच्याही भूमिका आहेत. 

Web Title: kangana ranaut declares her next movie emergency release date postponed to next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.