Kolkata Doctor Rape Murder Case: डॉक्टर बलात्कार अन् हत्याप्रकरणी कंगनाने CBI तपासाची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 01:11 PM2024-08-13T13:11:37+5:302024-08-13T13:13:41+5:30

कंगनाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत निषेध व्यक्त केला आहे.

Kangana Ranaut demands CBI inquiry in the Kolkata doctor rape-murder case | Kolkata Doctor Rape Murder Case: डॉक्टर बलात्कार अन् हत्याप्रकरणी कंगनाने CBI तपासाची केली मागणी

Kolkata Doctor Rape Murder Case: डॉक्टर बलात्कार अन् हत्याप्रकरणी कंगनाने CBI तपासाची केली मागणी

Kolkata Doctor Rape Murder Case : पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल काॅलेजमध्ये शिकणाऱ्या महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या (Kolkata Doctor Rape Murder Case) केल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी समोर आली. या क्रूरतेमुळे देशभरात खळबळ उडाली. डॉक्टर विद्यार्थिनीवर बलात्कार करुन खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. देशभरातुन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतने याप्रकरणी सीबीआय चौकशीची (Kangana Ranaut demands a CBI inquiry) मागणी केली आहे.


कंगनाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत निषेध व्यक्त केला आहे. तिने लिहिलं, "कोलकाताच्या सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर विद्यार्थिनीची हत्या करण्यात आल्याची ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. शुक्रवारी सकाळी सेमिनार हॉलमध्ये पदव्युत्तर विद्यार्थिनीचा अर्धनग्न मृतदेह आढळून आला. तिची निर्घृण हत्या करण्यात आली असून तिच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्टनुसार खून करण्याआधी तिचा रेप करण्यात आला".

पुढे तिनं लिहलं, "मला आशा आहे की या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला जाईल. हल्लेखोराला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल', असे म्हणत कंगनाने सीबीआय तपासाची मागणी केली आहे.  यासोबतच त्याने कोलकाता हा हॅशटॅगही वापरला आहे.  कंगनाची ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. त्याचबरोबर या प्रकरणी देशभरातील लोक आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. विविध सरकारी रुग्णालयांमधील शिकाऊ डॉक्टर, अंतर्वासित डॉक्टर आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर निदर्शने करत आहेत. दोषींना शिक्षा होईपर्यंत निदर्शने सुरूच ठेवणार असल्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाचा एका आठवड्यात तपास करण्यात पोलिसांना अपयश आल्यास, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले जाईल, असे जाहीर केले आहे. 

Web Title: Kangana Ranaut demands CBI inquiry in the Kolkata doctor rape-murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.