हा सौम्य दहशतवाद...! ‘Two Indias’ प्रकरणानंतर वीर दासवर भडकली कंगना राणौत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 04:45 PM2021-11-17T16:45:14+5:302021-11-17T16:46:03+5:30
वाचा काय आहे, ‘Two Indias’ प्रकरण? कंगनाने का केलं Vir Dasला लक्ष्य?
अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास (Vir Das) याची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आणि नव्या वादाला तोंड फुटलं. सोशल मीडियावर तर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. वीरदासने भारताचा अपमान केल्याचा आरोप करत, लोकांनी सोशल मीडियावर वीरदासला अक्षरश: झोडपून काढलं. मुंबई आणि दिल्लीत त्याचाविरोधात दोन गुन्हे दाखल झालेत. आता यावर अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut ) हिची प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर करत वीर दासवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाली कंगना?
‘जेव्हा तुम्ही सगळ्या भारतीय पुरुषांना गँग रेपिस्ट संबोधता तेव्हा तुम्ही जगभर भारतीयांविरुद्ध वर्णद्वेषाला प्रोत्साहित करता. बंगालमध्ये झालेल्या दुष्काळानंतर चर्चिल म्हणाले होते की, ‘हे भारतीय सशांसारखे मुलं जन्माला घालतात आणि ते असेच मरणार’. त्याने भारतात भुकेमुळे मरणाºया लाखो लोकांच्या मृत्युसाठी भारतीयांची लैंगिक इच्छा/प्रजनन क्षमता दोषी असल्याचं म्हटलं होतं. एखाद्या विशिष्ट समुदायाला अशाप्रकारे लक्ष्य करणं हा सौम्य दहशतवाद आहे. वीर दास विरोधात कठोर करवाई झालीच पाहिजे, असं कंगनाने तिच्या इन्स्टास्टोरीत म्हटलं आहे.
वीर दास असं काय म्हणाला?
This is Comedy?? Vir Das at Kennedy Center USA : "I come from an India where we worship Women in the morning & G@ng г@ре them at night" He might possibly be doing that BUT What gives him right to generalise & label India like that?? #VirDaspic.twitter.com/RwRIaGVe0I
— Rosy (@rose_k01) November 16, 2021
नुकताच वीर दासने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ हा व्हिडिओ अपलोड केला आहे. वॉशिंग्टन डीसी मधील जॉन एफ केनेडी सेंटरमध्ये त्याच्या अलीकडील सादरीकरणाचा हा व्हिडिओ होता. सहा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो,‘मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे एअर क्वॉलिटी इंडेक्स 9000 आहे तरीही आम्ही आमच्या छतावर झोपतो आणि रात्री तारे मोजतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान वाटतो आणि तरीही आम्ही भाजीपाला पिकवणाºया शेतकºयांवर धावून जातो.’ या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर लोक त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत.
या टीकेनंतर वीरदासने स्पष्टीकरण दिलं आहे. देशाचा अपमान करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. पण व्हिडीओ पूर्ण बघा. काही लोक या व्हिडीओच्या छोट्या क्लिप टाकून लोकांची दिशाभूल करत आहेत, असं त्याने स्पष्ट केलं आहे.