पासपोर्ट प्रकरणामुळे वैतागलेल्या कंगना राणौतने आमिर खानवर काढला राग, म्हणाली... 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 10:50 AM2021-06-17T10:50:32+5:302021-06-17T10:50:53+5:30

Passport Renewal Controversy :रोज नवे वादग्रस्त विधान करून कंगना चर्चेत असते. असेच एक वादग्रस्त विधान नडले आणि कंगनाचा पासपोर्ट नुतनीकरणाचे काम अडले. साहजिकच कंगना वैतागली.

Kangana Ranaut drags Aamir khan's intolerance remark amid her passport renewal controversy | पासपोर्ट प्रकरणामुळे वैतागलेल्या कंगना राणौतने आमिर खानवर काढला राग, म्हणाली... 

पासपोर्ट प्रकरणामुळे वैतागलेल्या कंगना राणौतने आमिर खानवर काढला राग, म्हणाली... 

googlenewsNext
ठळक मुद्दे 2015 मध्ये आमिर खानने देशात वाढत असलेल्या असहिष्णुततेच्या मुद्यावर भाष्य केले होते. कंगनाने त्याच्या याच वक्तव्याचा उल्लेख केला आहे.

मुद्दा कुठलाही असो कंगना राणौत (Kangana Ranaut) बोलणार नाही, हे शक्यच नाही. रोज नवे वादग्रस्त विधान करून ही बया चर्चेत असते. असेच एक वादग्रस्त विधान नडले आणि कंगनाचा पासपोर्ट नुतनीकरणाचे काम अडले. मग काय, पासपोर्ट नुतनीकरणासाठी कंगना न्यायालयात पोहोचली. न्यायालयाने तिच्या या प्रकरणाची सुनावणी 25 जूनपर्यंत सुनावणी पुढे ढकलली. साहजिकच कंगना वैतागली. या वैतागाच्या भरात तिने आमिर खानवर (Aamir khan) निशाणा साधला. आमिरच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख करत, माझा पासपोर्ट रोखला तसा त्याचा का नाही? असा सवाल तिने केला.
आपल्या इन्स्टा स्टोरीवर तिने एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने थेट आमिरला लक्ष्य केले. (Kangana Ranaut drags Aamir khan's intolerance remark amid her passport renewal controversy)

आमिर खानने भारताला असहिष्णू म्हणत भाजपा सरकारचा अपमान केला होता. पण ना कुणी त्याच्या चित्रपटाची शूटिंग थांबवले, ना कुणी त्याचा पासपोर्ट नाकारला. मला त्रास दिला जातोय, त्याला मात्र कुणीस असा त्रास दिला नाही, असे कंगनाने लिहिले.
कू अ‍ॅपवरही एक पोस्ट करत, तिने आपला संताप व्यक्त केला.  ‘महाविनाशकारी’ सरकारने मला पुन्हा त्रास द्यायला सुरवात केलीये. पासपोर्ट नुतनीकरणासाठी मी केलेला अर्ज नाकारण्यात आला. कारण काय तर एका टपोरी-रोडसाईट रोमियोने माझ्याविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल केलीय. माझ्या पासपोर्ट नुतनीकरणाच्या अर्जात अस्पष्टता असल्याचे कारण देत कोर्टानेही माझा अर्ज  नाकारला आहे, असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
कंगनावर वांद्रे पोलिस स्थानकात देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याने तिच्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी समस्या निर्माण झाली आहे. कंगना राणौतला  तिच्या ‘धाकड’ सिनेमाच्या शूटिंगसाठी हंगेरी या देशात जायचं आहे. मात्र, कंगनाचा पासपोर्टची मुदत 15 सप्टेंबरपर्यंतच असल्याने तिला पासपोर्टचं तातडीने नूतनीकरण करणे गरजेचे आहे. अन्यथा कंगनाला परदेशवारी करण्यात मयार्दा येऊ शकतात. यासाठीच कंगनाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

आमिर असे काय बोलला होता?
 2015 मध्ये आमिर खानने देशात वाढत असलेल्या असहिष्णुततेच्या मुद्यावर भाष्य केले होते. कंगनाने त्याच्या याच वक्तव्याचा उल्लेख केला आहे. मला आणि माझी पत्नी किरण आम्हा दोघांनाही मुलांच्या सुरक्षेसाठी दुस-या देशात स्थायिक होण्याचा सल्ला दिला जातो, असा खुलासा आमिरने त्यावेळी केला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती. यावर नंतर अभिनेता आमिर खानने स्पष्टीकरण सुद्धा दिले होते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे तो म्हणाला होता.
 

Web Title: Kangana Ranaut drags Aamir khan's intolerance remark amid her passport renewal controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.