Kangana Ranaut : कंगना चांदीच्या ग्लासातून का पिते पाणी?; आईने 'या' खास कारणासाठी दिलंय गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 03:49 PM2024-08-20T15:49:20+5:302024-08-20T16:02:36+5:30

Kangana Ranaut : कंगना राणौत चांदीच्या ग्लासातून पाणी पित असतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

Kangana Ranaut drinks water from silver glass reveals why mother advised her | Kangana Ranaut : कंगना चांदीच्या ग्लासातून का पिते पाणी?; आईने 'या' खास कारणासाठी दिलंय गिफ्ट

Kangana Ranaut : कंगना चांदीच्या ग्लासातून का पिते पाणी?; आईने 'या' खास कारणासाठी दिलंय गिफ्ट

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौतचांदीच्या ग्लासातून पाणी पित असतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कंगनाने ज्या ग्लासमधून पाणी प्यायलं त्याने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं होतं. यानंतर काही लोकांनी यावरून तिला ट्रोल करण्याचा देखील खूप प्रयत्न केला. याची खरंच गरज आहे का? असा सवालही विचारला. 

कंगना फक्त गरीबांना मदत करण्याबाबत मोठ्या मोठ्या गोष्टी करते आणि स्वत: मात्र चांदीच्या ग्लासातून पाणी पिते असं म्हटलं होतं. मात्र कंगनाने आपल्या चाहत्यांना याचं उत्तर दिलं. चांदीचा ग्लास सर्व रोगांना दूर ठेवतो आणि विषारी गोष्टींपासून आपलं रक्षण करतो, हे शुभ आहे असंही सांगितलं. 

यापूर्वी कंगना राणौतने तिच्या चांदीच्या ग्लासची झलक दाखवली होती. तसेच ती पाणी पिण्यासाठी चांदीचा ग्लासचा का वापर करते हे सांगितलं होतं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केली होती. "हा माझा चांदीचा ग्लास आहे. माझी आई म्हणते की, जर तुम्हाला एखाद्याला मारावंस वाटत असेल तर दीर्घ श्वास घ्या आणि या चांदीच्या ग्लासमधून पाणी प्या."

"चांदी चंद्राचं प्रतिनिधित्व करते आणि तुमचे मन शांत ठेवण्यास मदत करते. मी तेच करत आहे" असं अभिनेत्रीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. कंगनाच्या चांदीच्या ग्लासवर खास डिझाईन देखील करण्यात आलं आहे. कंगनाने राजकारणात आता एन्ट्री घेतली आहे. तसेच इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून प्रेक्षक खूप वाट पाहत आहेत. 
 

Web Title: Kangana Ranaut drinks water from silver glass reveals why mother advised her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.