बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौतने पाणीपुरीवर मारला यथेच्छ ताव!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 10:07 AM2019-04-05T10:07:40+5:302019-04-05T10:08:00+5:30
काल कंगना दिल्लीत फेरफेटका मारायला बाहेर पडली. अचानक तिची नजर रस्त्यावर उभ्या चाट सेंटरवर पडली. मग काय, ‘मणिकर्णिका’ला पाणीपुरी खाण्याचा मोह आवरता आला नाही.
बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री कंगना राणौत सध्या ‘पंगा’ या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. सध्या दिल्लीत या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. काल कंगना दिल्लीत फेरफेटका मारायला बाहेर पडली. अचानक तिची नजर रस्त्यावर उभ्या चाट सेंटरवर पडली. मग काय, ‘मणिकर्णिका’ला पाणीपुरी खाण्याचा मोह आवरता आला नाही. यानंतर कंगनाने गाडीतचं बैठक मारली आणि पाणीपुरीवर यथेच्छ ताव मारला. दिल्लीच्या रस्त्यावर कंगनाला पाणीपुरी खाताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण बिनधास्त कंगना मात्र पाणीपुरी खाण्यात मग्न होती. पाणीपुरी खातानाचा तिच्या चेहºयावरचा आनंद बघण्यासारखा होता. कंगनाच्या टीमने ‘मिशन गोलगप्पा’ या नावाखाली कंगनाचा पाणीपुरी खातानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून अनेकांना कंगनाच्या ‘क्वीन’ चित्रपटाची आठवण झाली. या चित्रपटात कंगना एम्स्टर्डममध्ये भारताच्या लोकप्रिय स्ट्रिट फूडचा स्टॉल लावते.
लवकरच कंगना ‘पंगा’ या चित्रपटात दिसणार आहे. यात कंगना एका कबड्डीपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाशिवाय कंगनाकडे ‘मेंटल है क्या’ आणि ‘जयललितांचे बायोपिक’ असे आणखी दोन चित्रपट आहे.‘मेंटल है क्या’ या चित्रपटात कंगना राजकुमार रावसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. जयललितांच्या बायोपिकबद्दल बोलायचे तर कंगनाने या चित्रपटासाठी घसघशीत फी घेतली आहे.
यापूर्वी कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या आयुष्यावर आधारित ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचे वारेमाप कौतुक झाले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिने केले होते.