शेवटपर्यंत 'इमर्जन्सी'च्या रिलीज डेटसाठी लढली कंगना राणौत, पण ठरली अपयशी, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 02:35 PM2024-09-06T14:35:13+5:302024-09-06T14:36:24+5:30

Emergency Movie : १९७५च्या आणीबाणीवर आधारित कंगना राणौतचा आगामी चित्रपट इमर्जन्सी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. एकीकडे कंगना तिचा चित्रपट पडद्यावर आणण्याच्या तयारीत होती, तर दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला हिरवा कंदील दिला नाही. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे.

Kangana Ranaut fought till the end for the release date of 'Emergency', but failed, said... | शेवटपर्यंत 'इमर्जन्सी'च्या रिलीज डेटसाठी लढली कंगना राणौत, पण ठरली अपयशी, म्हणाली...

शेवटपर्यंत 'इमर्जन्सी'च्या रिलीज डेटसाठी लढली कंगना राणौत, पण ठरली अपयशी, म्हणाली...

१९७५च्या आणीबाणीवर आधारित कंगना राणौत(Kangana Ranaut)चा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' ( Emergency Movie) बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. एकीकडे कंगना तिचा चित्रपट पडद्यावर आणण्याच्या तयारीत होती, तर दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला हिरवा कंदील दिला नाही. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. 

कंगना राणौत स्टारर पॉलिटिकल ड्रामा इमर्जन्सी गेल्या वर्षी २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र, काही कारणास्तव चित्रपट ७ महिन्यांसाठी पुढे ढकलला गेला आणि नवीन रिलीजची तारीख १४ जून निश्चित करण्यात आली. पण कंगनाच्या निवडणुकीच्या प्रवासामुळे हा चित्रपट १४ जूनलाही प्रदर्शित होऊ शकला नाही. अभिनेत्री मंडीतून खासदार होताच, काही दिवसांनी तिने चित्रपटाची नवीन रिलीज तारीख ६ सप्टेंबर ठेवली. मात्र आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

'इमर्जन्सी'ची रिलीज डेट पुढे ढकलल्यामुळे अभिनेत्री झाली नाराज
१४ ऑगस्ट रोजी आणीबाणीचा ट्रेलर रिलीज झाला आणि चित्रपटाबाबत गदारोळ सुरू झाला. सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने कंगना राणौतच्या चित्रपटाला प्रमाणपत्र दिले नाही आणि चित्रपट पुढे ढकलला गेला. ६ सप्टेंबर रोजी कंगना रणौतने तिच्या X (ट्विटरवर) हँडलवर पोस्ट शेअर केली. तिने लिहिले, "जड अंतःकरणाने, मी जाहीर करते की मी दिग्दर्शित केलेला चित्रपट 'इमर्जन्सी' पुढे ढकलण्यात आला आहे. आम्ही अजूनही सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्राची वाट पाहत आहोत, नवीन रिलीजची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, तुमच्या समजूतदारपणाबद्दल आणि संयमासाठी धन्यवाद."

न्यायालयात हरली लढाई 
कंगना राणौत स्टारर इमर्जन्सी, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित, शीख अंगरक्षकाने केलेल्या हत्येचाही उल्लेख आहे. अशा परिस्थितीत शीख संघटनेने चित्रपटाविरोधात खटला दाखल केला आहे, त्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने सीबीएफसीला १८ सप्टेंबरपर्यंत या प्रकरणावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत इमर्जन्सीच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तिथेही काही काम झाले नाही. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला विरोध करू शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे.
 

Web Title: Kangana Ranaut fought till the end for the release date of 'Emergency', but failed, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.