प्लास्टिक बॅगसोबत पतीची तुलना केल्याने ट्विंकलवर भडकली कंगना, म्हणाली, "तुम्हाला सोन्याच्या ताटात सगळं मिळतं म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 09:56 AM2024-02-22T09:56:52+5:302024-02-22T09:59:59+5:30

पतीची तुलना प्लास्टिक बॅगसोबत केल्याने कंगनाने ट्विंकल खन्नावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय. याशिवाय पोस्ट लिहून तिची चांगलीच शाळा घेतलीय.

Kangana ranaut gets angry at Twinkle khanna comparing husband to a plastic bag | प्लास्टिक बॅगसोबत पतीची तुलना केल्याने ट्विंकलवर भडकली कंगना, म्हणाली, "तुम्हाला सोन्याच्या ताटात सगळं मिळतं म्हणून..."

प्लास्टिक बॅगसोबत पतीची तुलना केल्याने ट्विंकलवर भडकली कंगना, म्हणाली, "तुम्हाला सोन्याच्या ताटात सगळं मिळतं म्हणून..."

कंगना रणौत (Kangana Ranaut) सतत विविध पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियावर चर्चेत असते. कंगना तिची परखड मतं सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच कंगनाने सुपरस्टार अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नावर (Twinkle Khanna) आगपाखड केली आहे. ट्विंकलने एका इव्हेंटमध्ये पतीची तुलना प्लास्टिक बॅगसोबत केली. त्यामुळे कंगना ट्विंकलवर चांगलीच भडकलेली पाहायला मिळाली. 

 कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहीलं की, “सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणारी ही माणसं त्यांच्या पतींना प्लास्टिक बॅग म्हणत आहेत. असं बोलून आम्ही किती कूल आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे? चांदीच्या चमच्याने जन्मलेल्या या नेपो किड्सना, सोन्याच्या ताटात फिल्मी करिअर दिलं गेलं, पण त्यांना निश्चितपणे न्याय देता आला नाही. किमान या व्यक्तींना मातृत्वाच्या निःस्वार्थीपणाचा आनंद मिळू शकतोय. अशा व्यक्तींना नक्की काय व्हायचं आहे? भाजीपाला? स्त्रीवाद असाच आहे का?" 

दरम्यान एका इव्हेंटमध्ये ट्विंकल म्हणाली होती, "आपण कधी समानता आणि स्त्रीवाद या मुद्द्यांवर बोलत नाही. तसं बघायला गेलं तर आपल्याला पुरुषांची गरज नाही. आपल्याजवळ एखादी चांगली प्लास्टिकची पिशवी असते तसंच आपल्या आयुष्यात पुरुषांची गरज असते. मी याच विचारसरणीत मोठी झालीय. पुरुषांचे केस महिलांच्याा तुलनेत लवकर गळतात. याशिवाय ते १० - १५ वर्ष आधीच मरण पावतात. त्यामुळे वाईटही वाटतं."

Web Title: Kangana ranaut gets angry at Twinkle khanna comparing husband to a plastic bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.