नैवेद्याच्या ताटात कांदा पाहून कंगना राणौतवर भडकले लोक ; म्हणाले, तू कसली हिंदू?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 05:40 PM2021-04-20T17:40:52+5:302021-04-20T17:45:51+5:30
इतके ट्रोल झाल्यानंतर कंगना गप्प कशी राहणार? ट्रोलर्सला तिनेही उत्तर दिले.
कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या ट्रोल होतेय. कारण काय तर तिने शेअर केलेला एक फोटो. होय, नवरात्रीच्या मुहूर्तावर आज दुर्गाष्टमीच्या दिवशी घराच्या नैवेद्याच्या थाळीचा एक फोटो कंगनाने शेअर केला आणि हा फोटो बघताच लोकांनी तिला ट्रोल करणे सुरू केले. नैवेद्याच्या ताटात कांदा पाहून खरे तर लोक भडकले. लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स करत, कंगनाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अर्थात कंगनानेही या ट्रोलर्सला जशास तसे उत्तर दिले.
Imagine to be fasting on ashtami when parsadam in your house looks like this .... अष्टमी की हार्दिक शुभकामनाएँ🥰🙏 pic.twitter.com/pRYp6KRDNX
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 20, 2021
कंगनाच्या घरी आज दुर्गाष्टमीची पूजा झाली. यावेळी विविध पक्वानांनी सजलेल्या नैवेद्याच्या थाळीचा फोटो तिने शेअर केला. या थाळीत शिरा, पुरी, रायता, छोले आणि सोबत कांदा आणि मिरची असे सगळे पदार्थ होते. हा फोटो शेअर करत, कंगनाने चाहत्यांना अष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. ‘अष्टमीचे व्रत असेल आणि घरी प्रसादाची अशी सजलेली थाळी असेल तर...,’ असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिले. मात्र हा फोटो पाहून लोक हैराण झालेत.
दीदी जी onion नही खाते है अष्ठमी मैं।
— PANKAJ VERMA (@PANKAJV94419647) April 20, 2021
दीदीजी, अष्टमीला कांदा वर्ज्य आहे, असे एका युजरने लिहिले. मैया के भोग में प्याज का क्या काम? अशा शब्दांत एका युजरने आपला राग व्यक्त केला. नवरात्रात कांदा कोण खातं? कशी हिंदू आहेस तू? असा सवाल एका युजरने कंगनाला केला. ‘तुम्हारी हरकत बता रही है, तुम्हारा मजहब नया नया है,’ असे एका युजरने लिहिले.
"Tumhari Harkat Bata Rahi Hai , Tumhara Mazhab Naya Naya Hai".
— Mohit Bhan موہت بھان (@buttkout) April 20, 2021
P.S - Onions are forbidden for 9 days of Navratri.#OnionAshtamihttps://t.co/SxLuneGumy
आपको इतना भी नहीं मालूम नवदुर्गा में प्याज कौन खाता है कैसी हिंदू हो आप
— Raju Singh fartyal (@SINGHRAJU94123) April 20, 2021
आता इतके ट्रोल झाल्यानंतर कंगना गप्प कशी राहणार? ट्रोलर्सला तिनेही उत्तर दिले. ‘हमारा मजहब बडा फ्लेग्जिबल है जी. बंगाल में तो दुर्गा पूजा में प्याज ही नहीं मीट और मछली भी खा सकते है... कोई फतवा नहीं जी... ऐश करो ऐश’, असे लिहित तिने ट्रोलर्सला गप्प करण्याचा प्रयत्न केला.