काय म्हणता? कंगना राणौत पाळणार दहा दिवसांचे मौनव्रत!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 02:57 PM2019-03-05T14:57:45+5:302019-03-05T14:58:02+5:30

गेल्या तीन महिन्यांपासून कंगना या ना त्या कारणांनी सतत वादात आहे. पण आता कदाचित ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’चे महत्त्व कंगनाला पटले आहे.

kangana ranaut go silent mode 10 days before 32nd birthday | काय म्हणता? कंगना राणौत पाळणार दहा दिवसांचे मौनव्रत!!

काय म्हणता? कंगना राणौत पाळणार दहा दिवसांचे मौनव्रत!!

googlenewsNext
ठळक मुद्देकंगनाचा ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ गत जानेवारीत प्रदर्शित झाला. या चित्रपटाने चार आठवड्यांत १०० कोटींची कमाई केली. लवकरच कंगनाचा ‘मेंटल है क्या’ आणि ‘पंगा’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि वाद हे जनु समीकरण झाले आहे. परखड स्वभावाची कंगना काहीही बोलो, त्याची बातमी होते. गेल्या तीन महिन्यांपासून कंगना या ना त्या कारणांनी सतत वादात आहे. पण आता कदाचित ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’चे महत्त्व कंगनाला पटले आहे. असे नसते तर कंगनाने दहा दिवस मौन ठेवण्याचा संकल्प सोडला नसता.
होय, तुम्ही वाचले ते अगदी खरे आहे. कंगना लवकरच दहा दिवस मौनव्रत पाळणार आहे. येत्या २३ र्माचला कंगना तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करतेय. या वाढदिवसाला स्वत:ला एक खास भेट देण्याचा निर्णय कंगनाने घेतलाय. ही भेट म्हणजे, दहा दिवसांचे मौनव्रत. कंगनाने स्वत: याचा खुलासा केला.

मी कोईम्बतूर येथे एका खास मेडिटेशनसाठी जात असल्याचे तिने सांगितले. या ध्यान शिबीराला जायची माझी खूप दिवसांची इच्छा होती. पण नेहमी हा प्लान फिस्कटत होता. पण यावेळी माझ्या वाढदिवसाआधी मी हे ध्यान शिबीर पूर्ण करणार आहे. मौनव्रत ही मी स्वत:ला दिलेली खूप मोठी भेट असेल, असे कंगना म्हणाली. अर्थात कंगनाने निश्चय केला म्हटल्यावर ती तो पूर्ण करणार. एकंदर काय, तर या दहा दिवसांनंतर एक बदललेली कंगना आपल्याला पाहायला मिळणार.


कंगनाचा ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ गत जानेवारीत प्रदर्शित झाला. या चित्रपटाने चार आठवड्यांत १०० कोटींची कमाई केली. लवकरच कंगनाचा ‘मेंटल है क्या’ आणि ‘पंगा’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Web Title: kangana ranaut go silent mode 10 days before 32nd birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.