'थलायवी'साठी कंगना राणौतने वाढवले होते 20 किलो वजन, घटविण्यासाठी घेतली खूप मेहनत
By तेजल गावडे | Updated: November 4, 2020 19:36 IST2020-11-04T19:35:06+5:302020-11-04T19:36:35+5:30
कंगना राणौतने जयललिता यांची भूमिका निभावण्यासाठी 20 किलो वजन वाढविले होते.

'थलायवी'साठी कंगना राणौतने वाढवले होते 20 किलो वजन, घटविण्यासाठी घेतली खूप मेहनत
बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौत आपल्या चित्रपट आणि भूमिकेसाठी खूप परिश्रम घेत असते. ती प्रत्येक भूमिकेला रुपेरी पडद्यावर न्याय देते. कंगना राणौत लवकरच थलाइवी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर आधारीत आहे. या बायोपिकमध्ये कंगनाला काम करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटातील भूमिका वास्तविक वाटण्यासाठी कंगनाला खूप मेहनत घ्यावी लागली.
कंगना राणौतने जयललिता यांची भूमिका निभावण्यासाठी 20 किलो वजन वाढविले होते. चित्रपटाचे कित्येक पोस्टर पाहून ते लक्षात येते. या भूमिकेला वास्तविक रुप देण्यासाठी मेकअपचा वापर केला आहे. कंगनाने वाढविलेले वजन घटविले आहे आणि पुन्हा ती फिट झाली आहे.
कंगनााने इतका घाम गाळला आहे की विचार करून तुम्ही थकून जाल. कंगनाने ट्विट करत सांगितले की, मी रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा सुपरगर्लची भूमिका केली होती. माझी बॉडी आहेच तशी जी सुंदरतेसोबत मजबूत आहे. मी थलायवीसाठी वीस किलो वजन वाढविले. वजन वाढवून भरतनाट्यम केले. ज्यामुळे मला बॅकचा प्रॉब्लेम झाला.
कंगनाने या भूमिकेसाठी अनेक समस्यांचा सामना केला आहे. मात्र कोणतीही भूमिका परफेक्ट सादर करण्याचा आनंद वेगळाच आहे. तिची ही मेहनत रुपेरी पडद्यावर दिसून येते. फॅट टू फिटच्या जर्नीबद्दल कंगना म्हणाली की, तिने खूप वर्कआउट केले आहे. तिने कित्येक तास घाम गाळला आहे. मात्र आता तिच्यानुसार तिचा स्टॅमिना पूर्वीसारखा राहिला नाही. ती अजूनही मेहनत घेते आहे.
कंगना राणौतचा शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन तेजस चित्रपटाच्या पोस्टरवर पहायला मिळतो आहे. या चित्रपटात कंगना पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.