​कंगना राणौत सुसाट ! कथालेखनाचे श्रेय घेतल्यानंतर ‘सिमरन’च्या एडिटींग टेबलवर कब्जा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 04:50 AM2017-08-01T04:50:53+5:302017-08-01T10:20:53+5:30

हंसल मेहता यांचा ‘सिमरन’ हा चित्रपट लवकरच रिलीज होतो आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेवर किती खरा उतरेल, हे आम्हाला ...

Kangana Ranaut happy! Capture Simran's editing table after taking credit for the story !! | ​कंगना राणौत सुसाट ! कथालेखनाचे श्रेय घेतल्यानंतर ‘सिमरन’च्या एडिटींग टेबलवर कब्जा!!

​कंगना राणौत सुसाट ! कथालेखनाचे श्रेय घेतल्यानंतर ‘सिमरन’च्या एडिटींग टेबलवर कब्जा!!

googlenewsNext
सल मेहता यांचा ‘सिमरन’ हा चित्रपट लवकरच रिलीज होतो आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेवर किती खरा उतरेल, हे आम्हाला ठाऊक नाही. पण एक मात्र खरे की, रिलीज आधीच हा चित्रपट फिमेल लीडमुळे चर्चेत आहे. होय, आम्ही बोलतोयं, ते कंगना राणौत हिच्याबद्दल. कंगना या चित्रपटात लीड रोलमध्ये आहे.
मध्यंतरी हा चित्रपट चर्चेत आला होता ते, कंगना व अपूर्व असरानी यांच्यातील मतभेदांमुळे. आता हा अपूर्व असरानी कोण? तर  ‘सिमरन’चा पटकथालेखक. या चित्रपटाची कथा अपूर्वने लिहिली आहे. पण अचानक चित्रपटाच्या कथालेखनाचे श्रेय कंगनाला विभागून दिले गेले. पटकथेचे सगळे श्रेय कंगना लाटत असलेली पाहून अपूर्व भलताच संतापला होता. कारण अपूर्वचे मानाल तर त्याने या कथेसाठी त्याच्या आयुष्याची दोन वर्षे दिली आहेत.  तर हा झाला एक एपिसोड. आता याच्याच पुढचा आणखी एक एपिसोड सध्या चर्चेत आहे. होय, केवळ पटकथा लेखनाचे श्रेय घेऊन कदाचित कंगना समाधानी नाही. आता म्हणे तिने ‘सिमरन’च्या एडिटींग टेबलवर कब्जा केला आहे. होय, कंगनाचे अलीकडचे सगळे चित्रपट आपटले. त्यामुळे ‘सिमरन’बद्दल कंगना कमालीची जागृत असल्याचे कळतेय. त्यामुळे चित्रपटाच्या एडिटींगमध्ये तिने जातीने लक्ष घातलेयं. सूत्रांचे मानाल तर, कुठली दृश्ये कापली जावीत, कुठली नाही, असे सगळे सल्ले ती एडिटींगच्या टेबलवर बसून देत आहे.

ALSO READ : ​कंगना राणौत लाटू पाहतेय ‘सिमरन’च्या लेखकाचे श्रेय? वाचा काय आहे प्रकरण!

निश्चितपणे कंगनाच्या या अशा वागण्यामुळे ‘सिमरन’ची संपूर्ण टीम वैतागली आहे. कंगनाच्या फुकटच्या सल्ल्यांमुळे ‘सिमरन’ची रिलीज डेट विनाकारण लांबत असल्याची कुजबुज टीममध्ये सुरु आहे. अर्थात हंसल मेहता मात्र कंगनावर जाम मेहरबान असल्याचे कळतेय. कंगनाच्या रचनात्मकतेवर म्हणे, त्यांचा प्रचंड विश्वास आहे. विशाल भारद्वाज यांनी ‘रंगून’च्या एडिटींगमध्ये कंगनाची मदत घेतली असती तर हा प्रोजेक्ट फेल ठरला नसता, इथपर्यंत ते बोलून गेल्याचे कळतेय. आता दिग्दर्शकालाच काही अडचण नसेल तर ‘सिमरन’च्या टीमला का असावी?

Web Title: Kangana Ranaut happy! Capture Simran's editing table after taking credit for the story !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.