विवाहपूर्व शारीरिक संबंधावरून कंगना आणि यूजर्समध्ये वाद-विवाद, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 03:41 PM2020-11-20T15:41:35+5:302020-11-20T15:49:17+5:30

काही वेळा तिची वक्तव्ये लोकांना पसंत पडतात. तर काहीवेळा तिला लोक ट्रोलही करतात. पण ती कंगना आहे प्रत्येकाला सडेतोड उत्तर देणं तिला चांगलंच माहीत आहे.

Kangana Ranaut hits back trollers who troll her for having premarital sex | विवाहपूर्व शारीरिक संबंधावरून कंगना आणि यूजर्समध्ये वाद-विवाद, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर...

विवाहपूर्व शारीरिक संबंधावरून कंगना आणि यूजर्समध्ये वाद-विवाद, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त आणि बोल्ड वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असते. कंगना कुणालाही न घाबरता आपली मते मांडते. सोबतच ती देशातील वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवरही आपली मते मांडत असते. काही वेळा तिची वक्तव्ये लोकांना पसंत पडतात. तर काहीवेळा तिला लोक ट्रोलही करतात. पण ती कंगना आहे प्रत्येकाला सडेतोड उत्तर देणं तिला चांगलंच माहीत आहे.

कंगना रणौत सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव राहते. अशाच एका ट्विटमुळे तिला यूजर्सकडून ट्रोल केलं जातंय. पण कंगनाने सुद्धा या ट्रोलर्सना सडेतोड उत्तरे दिली आहेत. सध्या याचीच चर्चा रंगली आहे.

काही महिन्यांपूर्वीच कंगनाने ट्विटरवर एन्ट्री घेतली. ज्यानंतर ती एकापाठी वादग्रस्त ट्विट करत आहे. शिवसेना नेते, मुख्यमंत्री, बीएमसी सगळ्यांशी तिने पंगा घेतला आहे. त्यामुळे ती नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. नुकतेच तिच्या एका पोस्टवर एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, 'विवाहपूर्व शारीरिक संबंध संस्कारी बाब नाही. तुम्ही सनातन धर्माच्या विरोधात आहात'. यावर कंगना यूजरला उत्तर दिले आहे.

कंगनाने यूजरला रिप्लाय करत लिहिले की, 'नाही नाही मी हॉट आणि सेक्सी आहे. मला याची गरज नाही'. कंगनाच्या या उत्तरावरून ट्विटर यूजर्सने तिला जोरदार ट्रोल करणं सुरू केले. पण कंगनानेही त्यांना जशास तसे उत्तर दिलं.

कंगनाने एका यूजरला रिप्लाय करत लिहिले की, 'मजा येत आहे की, कशाप्रकारे हे सर्व डिप्रेस आणि आत्मघाती नारीवादी विवाहपूर्व शारीरिक संबंधाबाबत वाद-विवाद करत आहेत. यातील काही तर यावरून चिखलफेक करत आहेत की, पद्मश्री पुरस्काने सन्मानित व्यक्तीसोबत शारीरिक संबंध आहेत. या विक्टोरियन-इस्लामी महिलेच्या कामुकतेच्या दृष्टीकोनासोबत माझे बर्फाचे गोळे वितळत आहेत'.
 

Web Title: Kangana Ranaut hits back trollers who troll her for having premarital sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.