Emergency First Look Out: इंदिरा गांधींच्या लूकमध्ये Kangana Ranautला ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 01:18 PM2022-07-14T13:18:51+5:302022-07-14T13:24:11+5:30

Kangana Ranaut Emergency first Look : इंदिरा गांधींच्या गेटअपमध्ये कंगनाला ओळखणं नेटकऱ्यांना कठीण झालंय.

Kangana ranaut indira gandhi look out first poster film emergency shoot begins | Emergency First Look Out: इंदिरा गांधींच्या लूकमध्ये Kangana Ranautला ओळखणं झालंय कठीण

Emergency First Look Out: इंदिरा गांधींच्या लूकमध्ये Kangana Ranautला ओळखणं झालंय कठीण

googlenewsNext

Kangana Ranaut Emergency first Look: बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut as Indira Gandhi) ) तिच्या चित्रपटातील व्यक्तिरेखांसाठी खूप मेहनत घेते. मग तो अभिनय असो वा लूक. कंगनाच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती, ज्यामध्ये ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अलीकडे, कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात तिने चित्रपटातील तिचा पहिला लूक शेअर केला आहे, ज्याला तिने कॅप्शन दिले आहे, सादर करतेय ज्याना सर म्हटलं जायचं.

आजवर चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालणारी हिंदी सिनेसृष्टीतील एकमेव अभिनेत्री बनलेली कंगना रणौत पुन्हा एकदा एका नव्या रूपात दिसणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांची भूमिका साकारणारी कंगना आता स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी बनली आहे. 'इमर्जंसी' या आगामी हिंदी चित्रपटासाठी कंगनानं इंदिरा गांधींचा वेष धारण केला आहे.

 'मणिकर्णिका' या चित्रपटानंतर 'इमर्जंसी'साठी कंगना पुन्हा एकदा दिग्दर्शिका बनली आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे, ज्यात इंदिरा गांधींच्या गेटअपमध्ये कंगना दिसते.

दिग्दर्शनासोबत कंगनानं रेनू पिट्टी यांच्या साथीनं या चित्रपटाची निर्मितीही केली आहे. रितेश शाह यांनी या चित्रपटासाठी पटकथा व संवादलेखन केलं आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. या चित्रपटात भारतातील इमर्जंसीचा काळ पहायला मिळणार आहे.
 

Web Title: Kangana ranaut indira gandhi look out first poster film emergency shoot begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.