कंगना राणौत पुन्हा आली चर्चेत, खरेदी केली महागडी कार; किंमत वाचून जाल चक्रावून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 01:25 PM2022-05-20T13:25:56+5:302022-05-20T13:29:28+5:30

Kangana Ranaut New Car: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या नवीन चित्रपट 'धाकड'मुळे चर्चेत आहे. आता तिने लक्झरी कार खरेदी केली आहे.

Kangana Ranaut is back in the spotlight, bought an expensive car; Read the price and go round | कंगना राणौत पुन्हा आली चर्चेत, खरेदी केली महागडी कार; किंमत वाचून जाल चक्रावून

कंगना राणौत पुन्हा आली चर्चेत, खरेदी केली महागडी कार; किंमत वाचून जाल चक्रावून

googlenewsNext

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. ती अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत काम करत असून आता कंगनाने चित्रपट निर्मितीमध्येही प्रवेश केला आहे. सध्या ती तिच्या 'धाकड' (Dhakad Movie) या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधी कंगना राणौतने एक लक्झरी कार खरेदी केली आहे, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कंगना राणौत तिच्या नवीन काळ्या रंगाच्या मर्सिडीज (मर्सिडीज मेबॅक एस680) कारसोबत दिसत आहे. कंगना राणौत कारसोबत पोज देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी कंगना तिच्या कुटुंबासोबत दिसत आहे.
या कारची किंमत कोटींमध्ये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना राणौतने ही नवीन कार जवळपास ५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. कंगनाकडे याशिवाय आणखी कारचे कलेक्शन आहे. या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीजच्या या कारचादेखील समावेश आहे.

कंगना राणौतचा 'धाकड' हा चित्रपट आज म्हणजेच २० मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात कंगना रणौतने एजेंट अग्निची भूमिका साकारली असून विशेष म्हणजे ती पहिल्यांदाच पडद्यावर दमदार अॅक्शन आणि स्टंट करताना दिसत आहे. या चित्रपटातील अॅक्शन सीनसाठी तिने अनेक महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे.

Web Title: Kangana Ranaut is back in the spotlight, bought an expensive car; Read the price and go round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.