Kangana Ranaut : कंगना रणौत करण जोहरला म्हणाली 'चाचा चौधरी', अनुष्का शर्माचं करिअर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 15:38 IST2023-04-07T15:37:50+5:302023-04-07T15:38:41+5:30
करण जोहरचा विषय म्हणजे बॉलिवूडची क्वीन कशी गप्प बसणार.

Kangana Ranaut : कंगना रणौत करण जोहरला म्हणाली 'चाचा चौधरी', अनुष्का शर्माचं करिअर...
अभिनेत्री अनुष्का शर्माचं (Anushka Sharma) करिअर उद्ध्वस्त करण्याचा दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) प्लॅन होता असं स्वत: त्यानेच काही दिवसांपूर्वी कबूल केलं. आता करण जोहरचा विषय म्हणजे बॉलिवूडची क्वीन कशी गप्प बसणार. करणच्या या खुलाश्यावर कंगनाने एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.
'रब ने बना दी जोडी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनुष्का शर्माने सर्वांचेच मन जिंकले. त्यानंतर 'बँड बाजा बारात' मधील तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. अनुष्का शर्माला घेऊ नको म्हणत करण आणि आदित्य चोप्राचं (Aditya Chopra) भांडण झालं. हिचं करिअर पूर्णपणे उद्धवस्त करायचं. मला दुसऱ्या अभिनेत्रीला भूमिका द्यायची होती पण आदित्यने ऐकलं नाही.'
करणच्या याच टिप्पणीवर कंगना रणौत भडकली आहे. तिने करणच्या त्या प्रेस कॉन्फरन्समधला स्क्रीनशॉट पोस्ट करत लिहिले, 'या चाचा चौधरीला तर फक्त एवढंच काम आहे.'
कंगनाची ही कमेंट आता भलतीच व्हायरल होत आहे. करण जोहरच्या बाबतीत होत असलेल्या एकाही चर्चेवर कमेंट करण्याची संधी कंगना सोडत नाही. मग भले ते नेपोटिझम असो किंवा बॉलिवूडमधील गटबाजी ती बिंधास्त बॉलिवूडच्या माफियांना भिडताना दिसते.