‘हिंदू धर्माची चेष्टा थांबवा...’, आलियाच्या नव्या जाहिरातीवर भडकली कंगना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 05:50 PM2021-09-21T17:50:10+5:302021-09-21T17:52:30+5:30
Kanyadaan Bridal AD Controversy: वाचा, जाहिरातीत नेमकं आहे तरी काय? काय म्हणाली पंगा गर्ल?
बॉलिवूडच्या अनेकांशी पंगा घेणारी कंगना राणौत (Kangana Ranaut)आता आलिया भटवर (Alia Bhatt) भडकलीये. कारण आहे आलियाची नवी जाहिरात.
होय, अलीकडे आलियाची एक नवी जाहिरात प्रसिद्ध झाली. या जाहिरातीत आलिया एका कपड्याच्या ब्रँडची जाहिरात करताना दिसतेय. पण ही जाहिरात अनेकांना खटकलीये. कंगनाही याच जाहिरातीवरून आलियावर बरसली आहे. जाहिरातीला विरोध करत कंगनाने एक लांबलचक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘आपण टीव्हीवर सर्रास पाहतो, जेव्हा सीमेवर कोणीही शहीद होतं त्यावेळी त्याचे वडील मोठ्याने ओरडतात आणि मी ठिक आहे, मला काहीही झाले नाही. मला आणखी एक मुलगा आहे. मी तो सुद्धा देशासाठी अर्पण करेन, असे म्हणतात. कन्यादान किंवा पुत्रदान यात समाजातील त्यागाची प्रवृत्ती दिसते. त्यागाची ही सर्वोच्च संकल्पना चुकीच्या पद्धतीने मांडली जात असेल तर रामराज्याच्या जीर्णोद्धाराची वेळ आली आहे, असे समजून जा. हिंदू धर्माची आणि त्यांच्या प्रथांची चेष्टा आता थांबवा. पृथ्वीला आणि स्त्रीला ‘आई’ म्हटले जाते. त्यांची पूजा केली जाते. त्यांना एक अनमोल संपत्ती आणि अस्तित्वाचे केंद्र मानण्यात काहीच नुकसान नाही. त्यामुळे मी सर्व ब्रँड्सला नम्र विनंती करते की, एखादी गोष्ट विकण्यासाठी धर्म, अल्पसंख्याक, बहुसंख्य राजकारणाचा वापर करू नका. या फूट पाडणाºया कल्पना आणि जाहिरातींमुळे भोळ्या ग्राहकांना गोंधळात टाकू नका,’ अशा शब्दांत कंगनाने या जाहिरातीवर टीका केली आहे.
जाहिरातीत नेमकं काय?
सध्या सोशल मीडियावर आलियाची जाहिरात चांगलीच व्हायरल होत आहे. या जाहिरातीत आलिया नववधूच्या पोशाखात लग्नमंडपात बसलेली दिसतेय. या जाहिरातीत तिने विवाह सोहळ्यातील कन्यादानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Multiple thoughts on what @aliaa08 thought getting into this:
— Wokeflix (@wokeflix_) September 18, 2021
1) I will become 4th wife but atleast I will have my dignity!
2) Kanyadan bad, father giving away bride in Church is sooo romantic and kool.
3) In her religion she doesn't get equal inheritance.#KanyaDaan#Moheypic.twitter.com/dvXaGvvUq7
मुलीला परक्याचे धन का म्हटले जाते, मुलगी ही दान करण्याची गोष्ट नाही. त्यामुळे कन्यादान नाही, कन्यामान, असा संदेश तिने या जाहिरातीमधून दिला आहे. मात्र, आलियाने कन्यादानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नेटकऱ्यांना आवडले नाही. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर आलिया आणि या कपड्याच्या ब्रॅण्डला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे.