येथे जिहादींचा भरणा, भाजपासाठी धोका...! आता कंगना इन्स्टाग्रामवर भडकली!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 10:24 AM2021-04-27T10:24:43+5:302021-04-27T10:26:39+5:30
Kangana Ranaut lashes out on Instagram : बॉलिवूडला सर्रास लक्ष्य करणारी, राजकारणावर बोलणारी, ट्विटरच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी कंगना आता इन्स्टाग्रामवर भडकली आहे.
कंगना राणौतला (Kangana Ranaut) उगाच ‘पंगा गर्ल’ म्हणत नाही. मुद्दा कुठलाही असो कंगना त्यावर बोलणार म्हणजे बोलणार आणि बोलणार म्हटल्यावर वादही ओढवून घेणार. बॉलिवूडला सर्रास लक्ष्य करणारी, राजकारणावर बोलणारी, ट्विटरच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी कंगना आता इन्स्टाग्रामवर (Instagram) भडकली आहे. केवळ इन्स्टाग्रामवर नाही तर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपस्थित युजर्सच्या विचारशक्तीवरही तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इन्स्टाग्राम हा कम्युनिस्टांचा आणि जिहादींचा अड्डा बनत असल्याचा आरोप करत, आगामी निवडणुकीत भाजपासाठी धोका बनला असल्याचाही दावा तिने केला आहे.
कंगनाने ट्विटरवर दोन ट्विट केलेत. ( Kangana Ranaut lashes out on Instagram )
पहिले ट्विट
इन्स्टाग्रामवर डम्ब आणि मूर्ख लोकांना भरणा आहे. या ठिकाणी उपस्थित लोकांमध्ये आयक्यु नसणे असहनीय आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये केवळ एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे येथे लहान बिझनेसला चालना मिळते. पण आता विरोधक याचा वापर स्वत:साठी करत आहेत. पाश्चिमात्यांची जीवनशैली प्रमोट करत, हे लोक भाजपाविरोधात द्वेष पसरवत आहेत, असे कंगनाने तिच्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
It’s tik-tok of middle-class, these dumbos are hijacked by capitalists/communists/Jihadis, this can be a very big threat for BJP for 2024 elections,if these jokers can wear cycling shorts beneath shirts in the name of fashion, they can be manipulated for pretty much anything 2/2
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 26, 2021
दुसरे ट्विट
दुस-या ट्विटमध्येही कंगनाने भडास काढली. तिने लिहिले, ‘इन्स्टाग्राम म्हणजे मिडलक्लास लोकांचे टिकटॉक आहे. या मूर्खांना धनाढ्यांनी, कम्युनिस्टांनी आणि जिहादींनी हायजॅक केले आहे. ही 2024 च्या निवडणुकीत भाजपासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. जे जोकर फॅशनच्या नावावर शर्टच्या खाली सायकलिंग शॉर्ट घालू शकतात, त्यांच्या मेंदूत काहीही पेरले जाऊ शकते. ’
याआधी कंगनाने ट्विटरच्या धोरणांवर असेच तोंडसुख घेतले होते. ट्विटरचे सीईओ जॅक डोर्जी यांना टॅग करत, तुम्ही इस्लामी देश आणि चीनी धोरणांसाठी विकले गेले आहात. तुम्ही केवळ स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहात, असे तिने म्हटले होते.