'या' बायोपिकसाठी कंगना राणौत गिरवणार तमिळ भाषेचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 09:00 PM2019-03-25T21:00:00+5:302019-03-25T21:00:00+5:30
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत लवकरच जयललिता यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा तमिळ आणि हिंदी भाषेत तयार करण्यात येणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत लवकरच जयललिता यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. कंगनाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने या गोष्टीची घोषणा केली. जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा तमिळ आणि हिंदी भाषेत तयार करण्यात येणार आहे.
या भूमिका साकारण्यासाठी कंगना तमिळ भाषेचे धडे गिरवणार असल्याचे तिने सांगितले. कारण सिनेमातले सीन तमिळमध्ये असणार आहेत. जयललिता यांची भूमिका समजण्यासाठी कंगना तमिळ शिकणार आहे. कंगना या सिनेमाला घेऊन खूपच उत्साही असल्याचे ती म्हणाली. हिंदीत 'जया' तर तामिळ भाषेत 'थलाईवी' असे सिनेमाचे नाव असणार आहे. एएल विजय या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून कवी विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.
जयललिता या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. अभिनयात मिळालेल्या यशानंतर त्या राजकारणाकडे वळल्या. त्यांनी तेलगू, कन्नड तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तामिळनाडूच्या त्या माजीमुख्यमंत्री होत्या. त्यांचे निधन 2016 मध्ये झाले. कंगना या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी तब्बल कंगनाने २४ कोटी रूपयांची भरभक्कम फी मागितली असल्याची चर्चा आहे. सुत्रांनुसार, दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाठी तिने मागितलेली २४ कोटींची रक्कम ही योग्य असल्याचे निर्माते समजत आहेत. कंगनाचा हा चित्रपट संपूर्ण भारतात पाहिला जाईल, यात काही शंका नसल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. जेव्हा उत्तर भारतातील एखादा कलाकार साऊथमध्ये चित्रपट करतात तेव्हा त्यामध्ये इतरही कलाकार असतात, पण या चित्रपटात मात्र केवळ कंगनाच मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय. सप्टेंबरमध्ये कंगना या सिनेमाचे शूटिंग सुरु करणार आहे.