#Thalaivi : ओळखा कोण? लूक पाहून चाहत्यांचा राग अनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 10:24 AM2019-11-24T10:24:39+5:302019-11-24T10:27:44+5:30
सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आणि या पोस्टरने चाहत्यांची निराशा केली.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकमध्येअभिनेत्री कंगना राणौत मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘थलायवी’ नामक या बायोपिकचा फर्स्ट लूक अर्थात पहिले पोस्टर नुकतेच रिलीज झाले आणि कंगना ट्रोल झाली. होय, कंगनाचा हा लूक चाहत्यांना अजिबात भावला नाही.
‘थलायवी’च्या पहिल्या पोस्टरवर कंगना रणौत जयललितांसारख्याच ग्रीन केपमध्ये दिसत आहेत. जयललितांप्रमाणे विक्ट्री साइन देताना दिसत आहे. खरे तर या सिनेमाची घोषणा झाली अगदी तेव्हा पासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आणि या पोस्टरने चाहत्यांची निराशा केली. या पोस्टरवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Neither she's looking like #Jayalalitha nor Kangana Ranaut.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 23, 2019
‘या पोस्टरमध्ये कंगना ना कंगनासारखी दिसतेय, ना जयललितांसारखी’, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. अन्य एका युजरने तर चांगलीच मजेशीर प्रतिक्रिया नोंदवली. ‘ कंगनाला तीन दिवस कुणीतरी पाण्यात भिजवून ठेवले असावे,’ असे या युजरने लिहिले.
My ideas execution
— ❦❦ இவள் வெண்பா(Venba)❦❦ (@paapabutterfly) November 23, 2019
In my mind in reality#Thalaivipic.twitter.com/JURXphY7iF
‘जणू एखादा पुतळा उभा केला आहे,’ असे एकाने लिहिले आहे.
ऐसे लग रहा है जैसे किसी पुतले को खड़ा कर दिया है
— राम मीणा (@BeingRam_) November 23, 2019
अनेक युजर्सनी कंगनाचा हा लुक म्हणजे जयललितांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. अर्थात कंगनाच्या या लूकचे कौतुक करणारेही काही आहेत. ब-याच लोकांनी कंगनाचा लुक आणि तिच्या मेहनतीचे कौतुक केले आहे.
Potato on angry mood......
— Hrithik_Mania 🇮🇳 (@iHrithik_Mania) November 23, 2019
😂😂🤣🤣#Thalaivipic.twitter.com/tEbk9bNIXj
प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये 26 जून 2020 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. जयललितांच्या या बायोपिकसाठी कंगनाने प्रोस्थेटिक मेकअपची मदत घेतली आहे.
#Thalaivi#jayalalitha's reaction from heaven after seeing #thalaivifirstlook
— 2πR (@iplacid_) November 23, 2019
🙆🤦#KanganaRanautpic.twitter.com/rJ1Q8FmPrc
हा मेकअप खूप जड असतो. तसेच हा मेकअप सांभाळणे कलाकरांसाठी एक टास्क असतो. या सिनेमासाठी ती भरतनाट्यम आणि तमिळ भाषा सुद्धा शिकली. जयललिता यांच्या बायोपिकसाठी कंगनाने 20 कोटी रुपयांचे मानधन घेतल्याची चर्चा आहे.