ओ, करण जोहर के पालतू...! दिलजीत दोसांजच्या टीकेनंतर कंगनाचा थयथयाट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 03:10 PM2020-12-03T15:10:21+5:302020-12-03T15:39:16+5:30
म्हणे, मी बब्बरशेरनी,तुमचे तोंड काळे करेन...
कंगना राणौत अनेक मुद्यावर बेधडक बोलते, अनेकांना वाट्टेल ते सुनावते, अनेकांवर बोचरी टीका करते. पण याऊलट तिच्यावर टीका होते, तेव्हा तह पेटून उठते. अभिनेता व गायक दिलजीत दोसांजने कंगनाला सुनावले आणि कंगना अशीच पेटून उठली. दिलजीतवर पलटवार करताना तिने सर्व मर्यादा लांघल्या. अगदी दिलजीतला करण जोहरचा ‘पालतू’ म्हणूनही हिणवले.
सध्या दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर कंगनाची टिवटिव सुरु आहे.या आंदोलनात सहभागी एका वृद्ध महिलेची खिल्ली उडवणारे ट्वीट तिने अलीकडे केले होते. यावरून ती जबरदस्त ट्रोल होतेय. दिलजीत दोसांज याने कंगनाच्या याच ट्वीटवर सणसणीत प्रतिक्रिया दिली.
‘कंगना, पुराव्यासोबत हे ऐक. बंदा इतना भी अंधा नहीं होना चाहिए,’अशा शब्दांत त्याने एक व्हिडीओ शेअर करत दिलजीतने कंगनाला फटकारले. मग काय कंगनाची सटकली. तिने दिलजीतला असा काही रिप्लाय दिला की, तिचे ट्वीट वाचून सगळेच हैराण झालेत.
Ooo Karan johar ke paltu, jo dadi Saheen Baag mein apni citizenship keliye protest kar rahi thi wohi Bilkis Bano dadi ji Farmers ke MSP ke liye bhi protest karti hue dikhi. Mahinder Kaur ji ko toh main janti bhi nahin. Kya drama chalaya hai tum logon ne? Stop this right now. https://t.co/RkXRVKfXV1
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 3, 2020
‘ओ,करण जोहर के पालतू, जो दादी शाहीन बाग में अपनी नागरिकता के लिए लिए प्रदर्शन कर रही थी, वही बिलकिस बानो दादी जी किसानों के एमएसपी के लिए भी प्रदर्शन करती हुई दिखी। महिंदर कौर जी को तो मैं जानती भी नहीं। क्या ड्रामा चलाया है तुम लोगों ने? इसे तुरंत खत्म करो ’, असे ट्वीट कंगनाने केले.
सुनो गिद्दों मेरी ख़ामोशी को मेरी कमज़ोरी मत समझना, मैं सब देख रही हूँ किस किस तरह से तुम झूठ बोलकर मासूमों को भड़का रहे हो और उनको इस्तेमाल कर रहे हो, जब शाहीन बाग़ की तरह इन धरनों का रहस्य खुलेगा तो मैं एक शानदार स्पीच लिखूँगी और तुम लोगों का मुँह कला करूँगी- बब्बरशेरनी pic.twitter.com/mYx5mmLkEE
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 3, 2020
ती इथेच थांबली नाही तर पाठोपाठ तिने आणखी एक दुसरे ट्वीट केले. ‘सुनो गिद्दों मेरी खामोशी को मेरी कमजोरी मत समझना, मैं सब देख रही हूँ किस किस तरह से तुम झूठ बोलकर मासूमों को भड़का रहे हो और उनको इस्तेमाल कर रहे हो, जब शाहीन बाग की तरह इन धरनों का रहस्य खुलेगा तो मैं एक शानदार स्पीच लिखूँगी और तुम लोगों का मुँह कला करूँगी- बब्बरशेरनी’, असे तिने लिहिले.
Tuneh Jitne Logon Ke Saath Film Ki Tu Un Sab Ki Paaltu Hai...?
Fer To List Lambi Ho Jaegi Maalko Ki..?
Eh Bollywood Wale Ni PUNJAB Wale aa .. Hikk Te Vajj Sadey
Jhooth bol kar logo ko badhkana aur emotions se khailna woh toh aap achey se janti ho..😊 https://t.co/QIzUDoStWs— DILJIT DOSANJH (@diljitdosanjh) December 3, 2020
करण जोहरचा ‘पालतू’ म्हटल्यावर दिलजीतनेही उत्तर दिले. पण त्याचे ट्वीट वाचून कंगना आणखी भडकली. तिने त्यावर काय ट्वीट केले, ते पाहून सगळेच थक्क झालेत.
काय होते कंगनाचे ट्विट?
शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिंदर कौर या 87 वर्षांच्या आहेत. याच आजीची तुलना कंगनाने शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादीसोबत केली होती. ‘ही १०० रूपयात अव्हेलेबल आहे. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तिच आहे,’ असे ट्वीट कंगनाने केले होते. यानंतर सोशल मीडियावरून कंगानाचा विरोध होऊ लागला होता. ट्रोल होताच कंगनाने हे ट्वीट डिलीट केले होते.