पीएम मोदींच्या विजयाने कंगना राणौत खूश्श...सगळ्यांना दिली हटके ट्रिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 14:17 IST2019-05-24T14:16:16+5:302019-05-24T14:17:08+5:30
लोकसभा निवडणुकीतील पीएम मोदींच्या विजयाने मोदी समर्थकांममध्ये आनंदाचे वातावरण आहे. बॉलिवूडही याला अपवाद नाही. अभिनेत्री कंगना राणौत ही सुद्धा मोदींच्या विजयामुळे खुश्श आहे. मग या आनंदाचे हटके सेलिब्रेशन तर बनतेच.

पीएम मोदींच्या विजयाने कंगना राणौत खूश्श...सगळ्यांना दिली हटके ट्रिट
लोकसभा निवडणुकीतील पीएम मोदींच्या विजयाने मोदी समर्थकांममध्ये आनंदाचे वातावरण आहे. बॉलिवूडही याला अपवाद नाही. अभिनेत्री कंगना राणौत ही सुद्धा मोदींच्या विजयामुळे खुश्श आहे. मग या आनंदाचे हटके सेलिब्रेशन तर बनतेच. मोदींच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी कंगनाने काय करावे, तर चक्क स्वत:च्या हातांनी चहा आणि भजी बनवून घरातील सर्वांना खाऊ घातलीत.
होय, कंगनाची बहीण रंगोलीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ‘कंगना आनंदात असते, तेव्हा ती किचनमध्ये जाऊन सर्वांसाठी काहीतरी खास बनवते. आज पीएम मोदींना मिळालेल्या विजयानंतर ती खूश आहे. तिने आम्हाला चहा आणि भजीची मस्त ट्रीट दिली,’ असे रंगोलीने हे फोटो शेअर करताना लिहिले आहे. या फोटोमध्ये कंगना किचनमध्ये भजी बनवताना आणि नंतर घरातील सर्व सदस्यांसोबत त्याच्या आस्वाद घेताना दिसत आहे.
कंगनाने अलीकडे कान्स फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये हजेरी लावली होती. कान्स फिल्म फेस्टिवल 2019च्या रेड कार्पेटवर अनेकींनी एकापेक्षा एक ग्लॅरस वेस्टर्न आऊटफिटसमध्ये एन्ट्री घेतली असताना कंगनाने मात्र या खास इंटरनॅशनल इव्हेंटसाठी इंडियन लूकची निवड केली होती. तिचा हा लूक पाहून सगळेच तिच्या प्रेमात पडले होते.
कंगनाकडे सध्या ‘पंगा’ आणि ‘मेंटल है क्या’ असे दोन सिनेमे आहेत. ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे. हा सिनेमा 26 जुलैला रिलीज होणार आहे. याआधी हा सिनेमा आणि हृतिक रोशनचा ‘सुपर 30’ एकाच दिवशी रिलीज होणार होते. कंगनाशी ‘पंगा’ टाळण्यासाठी हृतिकने त्याच्या सिनेमाची तारीख पुढे ढकलली.